शेतकऱ्यांच्या विधेयकांसाठी राष्ट्रपतींना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:00 AM2018-04-26T01:00:25+5:302018-04-26T01:00:25+5:30
जयसिंगपूर : लोकसभेत आणि राज्यसभेत शेतकºयांची दोन खासगी विधेयके मांडण्यात येणार असून, याप्रश्नी राष्ट्रपतींना भेटण्याचा निर्णय घेत अंतिम मसुद्याला बुधवारी दिल्ली येथे विरोधी पक्ष नेत्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. नवी दिल्ली येथे आॅल इंडिया किसान संघर्ष को-आॅर्डिनेशन समिती या देशातील १९३ शेतकरी संघटनांच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्यावतीने आमंत्रित बैठकीस देशातील प्रमुख राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार उपस्थित होते. यावेळी पवार यांनी मार्गदर्शन करत विधेयकाबाबत महत्त्वाच्या सूचना दिल्या. बैठकीत शेतकºयांच्या प्रश्नावर संपूर्ण देशभर आवाज उठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच १० मे रोजी १८५७ च्या बंडाला १६१ वर्षे पूर्ण होत आहेत. त्या दिनाचं औचित्य साधून देशभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकºयांच्या प्रश्नांवर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने शेतकºयांना कर्जमुक्ती व शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव यासाठी गेल्या वर्षभरापासून संघर्ष सुरू आहे. शेतकºयांचा सातबारा कर्जातून कोरा करण्यात यावा तसेच स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमालास उत्पादन खर्चाच्या आधारावर खर्च अधिक किमान पन्नास टक्के अधिक दर मिळावा या प्रमुख मागणीकरिता संसदेमध्ये मांडण्यात येणाºया खासगी सदस्य विधेयकाच्या मसुद्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. देशभरातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये या विधेयकाच्या मंजुरीसाठी ठराव करण्याचा निर्णय झाला, तसेच या सर्व ठरावाच्या प्रती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष यांना पाठविण्याचा यावेळी निर्णय घेण्यात आला. बैठकीस खा. शरद यादव, खा. अरविंद सावंत, जयप्रकाश यादव, खा. नरेंद्र कुमार, खा. दिनेश त्रिवेदी, कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष टी. हक, दीपेंद्रसिंग हुडा, जयंत चौधरी, आशुतोष गुप्ता, हानन मौला, व्ही. विजय साई रेड्डी, तसेच सुकाणू समितीतर्फे निमंत्रक व्ही. एम. सिंग, किरण व्ही., कविता के., आदी उपस्थित होते.
भाजपला शेतकरीच उत्तर देतील : राजू शेट्टी
भाजपने सत्तेमध्ये येताना शेतकºयांना जी आश्वासने दिलेली होती, ती अद्याप पाळलेली नाहीत. शेतकºयांना दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमुक्ती यासाठी त्यांना सत्तेत बसविले आहे. तो शब्द त्यांनी पाळावा, शेतकºयांची ही दोन विधेयके आहेत, त्यास त्यांनी बिनशर्त पाठिंबा द्यावा, अन्यथा हेच शेतकरी भाजपला सत्तेतून पायउतार करतील, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी यावेळी दिला.