अर्जुनवाडमध्ये बिरदेव संस्थेची सभा उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:23 AM2021-04-02T04:23:31+5:302021-04-02T04:23:31+5:30
उदगावमध्ये कोविड लसीकरण सुरू उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. व्याधीग्रस्त ...
उदगावमध्ये कोविड लसीकरण सुरू
उदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली. व्याधीग्रस्त व साठ वर्षांवरील नागरिकांना कोरोना लस देण्यात आली. कोविशिल्ड लस ही पूर्णपणे सुरक्षित असून सर्वांनी न घाबरता लस घ्यावी, असे आवाहन जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी केले.
कोरोना लसीचा वाढता प्रसार पाहता, त्यावर लसीकरण हाच एक पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विभागाला मदत करावी, असे समाजकल्याण सभापती स्वाती सासणे यांनी सांगितले.
कार्यक्रमास सरपंच कलिमुन नदाफ, हिदायत नदाफ, ग्रामविकास अधिकारी रायसिंग वळवी, स्नेहा कुरुंदवाडे, पोलीसपाटील अनुराधा कांबळे उपस्थित होत्या.
रस्ता दुरुस्तीमुळे समाधान
जयसिंगपूर : नांदणी ते भैरववाडीकडे जाणाऱ्या मार्गाची दुरुस्ती करण्यात आल्याने वाहनधारकांतून समाधान व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या मार्गाची मोठी दुरवस्था झाली होती. नांदणी ते स्मशानभूमीपर्यंतचा रस्ता खड्डेमय बनला होता. या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आल्याने वाहतूक सुरळीत झाली आहे.