रेडिरेकनर दराबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक राजीव परीख : अधिवेशनानंतर भेटणार; ‘लोकमत’ला सदिच्छा भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2019 01:05 AM2019-02-27T01:05:25+5:302019-02-27T01:05:40+5:30
बांधकाम क्षेत्रातील उलाढाल अपेक्षेप्रमाणे अजून वाढलेली नाही; त्यामुळे यावर्षी राज्य शासनाने रेडिरेकनरचे दर कमी करावेत, या मागणीसाठी ‘क्रिडाई महाराष्ट्र’कडून पाठपुरावा सुरू आहे.
कोल्हापूर : बांधकाम क्षेत्रातील उलाढाल अपेक्षेप्रमाणे अजून वाढलेली नाही; त्यामुळे यावर्षी राज्य शासनाने रेडिरेकनरचे दर कमी करावेत, या मागणीसाठी ‘क्रिडाई महाराष्ट्र’कडून पाठपुरावा सुरू आहे. याबाबत अधिवेशनानंतर मुख्यमंत्र्यांसमवेत संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक होईल, असे ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे नूतन अध्यक्ष राजीव परीख यांनी मंगळवारी येथे सांगितले.
अध्यक्ष परीख यांनी ‘लोकमत’च्या शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष परीख यांचे स्वागत केले. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, जाहिरात व्यवस्थापक विवेक चौगुले, साहाय्यक जाहिरात व्यवस्थापक उदय चौगले, ‘क्रिडाई कोल्हापूर’चे माजी अध्यक्ष गिरीष रायबागे, विद्यमान उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, सदस्य अभिजित मगदूम, उत्तम फराकटे, सुजय होसमणी, संजय डोईजड, श्रेयांश मगदूम, गौतम परमार उपस्थित होते. अध्यक्ष परीख म्हणाले, गेले वर्ष वगळता त्यामागील चार वर्षे राज्य शासनाने रेडिरेकनरचे दर वाढविले आहेत. इतके दर वाढविण्याची गरज नव्हती. मागील तीन वर्षांपासून बांधकाम क्षेत्रातील उलाढाल संथपणे होत आहे. त्यात अजूनही अपेक्षेप्रमाणे वाढ झालेली नाही; त्यामुळे यावर्षी रेडिरेकनरचे दर वाढविण्यात येऊ नयेत.
व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यावर भर
या ठिकाणी वास्तविकतेपेक्षा अधिक दरवाढ झाली आहे. ती कमी करावी, अशी मागणी ‘क्रिडाई महाराष्ट्र’ने राज्यातील लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून शासनाकडे केली आहे.
रेडिरेकनरचे दर वाढू नयेत, ते कमी व्हावेत यासाठी संघटनेचा नेटाने पाठपुरावा सुरू आहे.
बांधकाम व्यावसायिकांसमोरील अडचणी शासन दरबारी मांडून त्या जलदगतीने सोडविण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे.
कोल्हापुरात मंगळवारी ‘क्रिडाई महाराष्ट्र’चे नूतन अध्यक्ष राजीव परीख यांनी ‘लोकमत’ला सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले यांनी केले. यावेळी डावीकडून विवेक चौगुले, गिरीष रायबागे, उत्तम फराकटे, अभिजित मगदूम, विद्यानंद बेडेकर, मकरंद देशमुख, सुजय होसमणी, गौतम परमार, श्रेयांश मगदूम, संजय डोईजड उपस्थित होते.