कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची पूजा करून विरोधकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 05:20 PM2019-06-19T17:20:58+5:302019-06-19T17:23:08+5:30

महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात धरण्यात आलेल्या विकास निधीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत सत्तारूढ गटाने केलेल्या या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला.

By meeting the corporation budget of Kolhapur, the protesters will not attend | कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची पूजा करून विरोधकांचा सभात्याग

कोल्हापूर महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकाची पूजा करून विरोधकांचा सभात्याग

Next
ठळक मुद्देअंदाजपत्रकाची पूजा करून विरोधकांचा सभात्यागआगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध

कोल्हापूर : ‘महानगरपालिकेच्या यंदाच्या अंदाजपत्रकात धरण्यात आलेल्या विकास निधीत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले असून, हा निधी गेला कुठे?’ अशी विचारणा करीत सत्तारूढ गटाने केलेल्या या फेरबदलाचा निषेध म्हणून विरोधी गटाच्या नगरसेवकांनी बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेतून सभात्याग केला.

सभात्याग करण्यापूर्वी त्यांनी अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची सभागृहातच पुष्पहार घालून तसेच हळद-कुंकू लावून पूजा करीत आगळ्यावेगळ्या पद्धतीने निषेध नोंदविला. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर सरिता मोरे होत्या.

बुधवारी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी विकासकामांकरिता अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेल्या निधीचा विषय उपस्थित केला. त्यावर विरोधी सदस्यांनी सभेत गोंधळ घातला.

स्थायी समितीने ज्या कामांसाठी निधीची तरतूद केली होती, अशी अनेक कामे अंदाजपत्रकाच्या पुस्तकात दिसत नाहीत. मग हा निधी कोठे गेला, कोणत्या कामांकरिता धरण्यात आला, याची माहिती द्यावी, अशी मागणी कदम यांनी केली.

सत्ता तुमची आहे म्हणून काहीही करता का? कोणाला विचारून हे बदल केले ? असे सवाल करीत अंदापत्रकातील फेरबदल आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा कदम यांनी सभेत दिला. आमच्या आघाडीच्या सदस्यांवर अन्याय होत असल्याची तक्रार कदम यांनी यावेळी केली.

निषेध म्हणून विरोधी गटाच्या सदस्यांनी सभागृहातच अंदाजपत्रकाच्या पुस्तकाची पूजा केली. यावेळी पुस्तकास पुष्पहार घातला, हळद-कुंकू वाहिले, नारळ अर्पण केला आणि हे पुस्तक आयुक्तांकडे सादर करीत आम्हांला तुमच्याकडून न्याय अपेक्षित असल्याचे कदम यांनी सांगितले.


सहायक आयुक्त संजय सरनाईक यांनी समाधानकारक उत्तर न देता, ‘महापालिकेचा निधी कोणत्या कामावर किती खर्च होणार आहे, याची सगळी माहिती पुस्तकात असल्याने वेगळी माहिती देण्याची आवश्यकता नाही,’ असे सांगताच सत्यजित कदम पुन्हा भडकले. आम्हाला अंदाजपत्रकातील काही कळत नाही. तुम्ही आम्हाला माहिती द्या, अशी त्यांनी सुूचना केली. तेव्हा सरनाईक यांनी ‘जेथे बदल झाले आहेत त्यांची माहिती तुम्हाला दिली जाईल,’ असे सांगितले. तरीही विरोधी गटाच्या सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभात्याग केला.
 

 

Web Title: By meeting the corporation budget of Kolhapur, the protesters will not attend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.