वस्त्रोद्योगाबाबत आज मंत्रालयात बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:26 AM2021-03-16T04:26:02+5:302021-03-16T04:26:02+5:30
इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील विविध समस्यांचा आढावा घेऊन शासनाने जाहीर केलेल्या योजना व त्याची अंमलबजावणी यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन ...
इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील विविध समस्यांचा आढावा घेऊन शासनाने जाहीर केलेल्या योजना व त्याची अंमलबजावणी यासंदर्भात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन आज, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात केले आहे. याबाबतची मागणी आमदार प्रकाश आवाडे यांनी केली होती.
मंत्रालयात मंगळवारी दुपारी अडीच वाजता ही बैठक होणार असून, त्यामध्ये यंत्रमाग व सहकारी सूतगिरण्यांच्या समस्यांचा आढावा घेतला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगाला उभारी देण्यासाठी शासनाने विविध सवलतींचे निर्णय घेतले. परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. याचे विपरित परिणाम वस्त्रोद्योगावर होत आहेत. त्यावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीस उपमुख्यमंत्री पवार यांच्यासह वस्त्रोद्योग मंत्री, सहकार मंत्री, पणन राज्यमंत्री, वस्त्रोद्योग राज्यमंत्री, ऊर्जामंत्री, उद्योगमंत्री, खासदार, आमदार, त्याचबरोबर राष्ट्रवादीचे मदन कारंडे व वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.