उचंगी पुनर्वसनासंदर्भात एप्रिलमध्ये मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:24 AM2021-03-18T04:24:12+5:302021-03-18T04:24:12+5:30

चाफवडे (ता. आजरा) येथे अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे व धरणग्रस्तांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत ...

Meeting in Mumbai in April regarding high rehabilitation | उचंगी पुनर्वसनासंदर्भात एप्रिलमध्ये मुंबईत बैठक

उचंगी पुनर्वसनासंदर्भात एप्रिलमध्ये मुंबईत बैठक

Next

चाफवडे (ता. आजरा) येथे अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे व धरणग्रस्तांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत धरणग्रस्तांच्या १४ पुनर्वसनाच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे संकलन रजिस्टर दुरुस्त करणे, धरणग्रस्तांची जादा जमीन शिल्लक राहिली म्हणून जमीन नाकारली आहे. त्यांना लाभक्षेत्रात जमीन मिळावी, निर्वाहचा शेरा रद्द करावा, दोन मीटर वाढविलेल्या उंचीवरील जमीन संपादन करण्यात यावी, आदेश झालेल्या प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे वाटप करावे, उजव्या तीरावरील रस्त्याचे काम तातडीने करावे, चाफवडे गावातील पाण्याच्या पातळीलगत असणारे १५० घरांचा प्रस्ताव तातडीने मंजूर करावा, धरणग्रस्तांचे भुईभाडे व ६५ टक्के रक्कमेवरचे व्याज वाटप करावे, धरणग्रस्तांनी पुनर्वसनासंदर्भात दिलेले अर्ज तातडीने निर्गत करावेत, लाभक्षेत्राच्या बाहेरील पुनर्वसन जमिनी प्रकल्पग्रस्ताने घेतल्यास पुनर्वसन कायद्याप्रमाणे चारपट जमीनवाटप करण्यात यावी, जेएमसीमध्ये घरे, फळझाडे, पाइपलाइन व जमीन चुकलेली आहे. ती संपादन करून घ्यावी व त्याचे सानुग्रह अनुदान द्यावे.

बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा पुनर्वसन अधिकारी अश्विनी जिरंगे, प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी, तहसीलदार विकास अहिर, धरणग्रस्तांचे नेते कॉ. संजय तर्डेकर, संजय भडांगे, विलास धडाम, मारुती चव्हाण, दत्ता बापट यासह धरणग्रस्त उपस्थित होते.

-

* संकलन रजिस्टर दुरुस्तीबाबत शिबिर

धरणग्रस्तांचे संकलन रजिस्टर दुरुस्त करण्यासंदर्भात पुढील महिन्यात ७ ते १० एप्रिलदरम्यान शिबिर घेतले जाणार आहे. शिबिर चाफवडे, चितळे, जेऊर येथे होणार असून, त्यामध्ये संकलनाचे सर्व प्रश्नांची सोडवणूक केली जाईल, असे प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी सांगितले.

Web Title: Meeting in Mumbai in April regarding high rehabilitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.