पट्टणकोडोलीत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:18 AM2021-06-03T04:18:46+5:302021-06-03T04:18:46+5:30
पट्टणकोडोली गावामध्ये २७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील कोरोना संसर्ग थांबविण्याच्या ...
पट्टणकोडोली गावामध्ये २७४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे गावातील कोरोना संसर्ग थांबविण्याच्या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी ग्रामपंचायत कार्यालयात अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये गायकवाड यांनी काही रस्ते बंद करावेत. प्रभागातून आरटीपीसीआर चाचण्या वाढवून पॉझिटिव्ह रुग्णांना संस्थात्मक अलगीकरण करणे. गावातील बाजार बंद करणे. विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणे याबाबतच्या सूचना कोरोना सहनियंत्रण समिती व ग्रामपंचायत प्रशासनाला दिल्या. यावेळी पोलीस उपअधीक्षक बाबूराव महामुनी, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, सरपंच विजया जाधव,उपसरपंच अंबर बनगे, तालुका पंचायत सदस्य अरुण माळी, कोरोना सहनियंत्रण समितीचे सदस्य व आरोग्य विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.