सिरसे येथे सरपंच संघटनेची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:26 AM2021-08-23T04:26:39+5:302021-08-23T04:26:39+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क : महापूर परिस्थितीचा अभ्यास व पूर नियंत्रणच्या उपाययोजना याचा शास्त्रीय अहवाल तयार करून महापुराचा धोका कमी ...

Meeting of Sarpanch Association at Sirse | सिरसे येथे सरपंच संघटनेची बैठक

सिरसे येथे सरपंच संघटनेची बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क :

महापूर परिस्थितीचा अभ्यास व पूर नियंत्रणच्या उपाययोजना याचा शास्त्रीय अहवाल तयार करून महापुराचा धोका कमी करावा यासाठी जिल्हा स्तरावर कमिटी नेमून ही एक चळवळ उभी राहावी. महापुरापासून शेतकरी वाचला पाहिजे. यासाठी बाजीराव खाडे यांच्या पुढाकाराने व राधानगरी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने तालुक्यातील पूरग्रस्त गावच्या प्रमुख सरपंचाची बैठक सिरसे, ता. राधानगरी येथे पार पडली.

यावेळी पं. स. सदस्य उत्तम पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष विलासराव पाटील, राशिवडेचे सरपंच कृष्णात पोवार, आमजाई व्हरवडेचे सरपंच आनंदराव कांबळे, पुगांवचे सरपंच, आवळी बु.चे सरपंच सर्जेराव कवडे, ठिकपुर्लीचे शिवाजी कांबळे, कोदवडेचे धनाजी पाटील, खिंडी व्हरवडेचे राजकुमार पाटील, बरगेवाडीचे धनाजी बरगे, सुभाष बरगे. सिरसेचे डे सरपंच बाळासो लोखंडे, आदी प्रमुख गावचे सरपंच उपस्थित होते.

स्वागत व प्रास्ताविक सरपंच सुभाष पाटील सिरसेकर यांनी केले. आभार सर्जेराव कवडे यांनी मानले.

फोटो

सिरसे, ता. राधानगरी येथे झालेल्या सरपंचाच्या बैठकीत बोलताना बाजीराव खाडे, आनंदराव कांबळे, सुभाष पाटील, सिरसेकर व मान्यवर सरपंच.

Web Title: Meeting of Sarpanch Association at Sirse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.