शिक्षक बॅँकेची २४ सप्टेंबरला सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2017 01:56 PM2017-09-09T13:56:28+5:302017-09-09T13:56:28+5:30
प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आयर्विन मल्टीपर्पज हॉल कोल्हापूर येथे आयोजित केली आहे. ताळेबंदासह ‘ओटीएस’ योजना व स्टाफींग पॅटर्नला मंजूरी देण्याबाबत विषय पत्रिकेवर ठेवण्यात आला आहे.
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक सहकारी बॅँकेची ७८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा २४ सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता आयर्विन मल्टीपर्पज हॉल येथे आयोजित केली आहे. ताळेबंदासह ‘ओटीएस’ योजना व स्टाफींग पॅटर्नला मंजूरी देण्याबाबत विषय पत्रिकेवर ठेवण्यात आला आहे.
शिक्षक बॅँकेची सभा आणि वाद हे समीकरण ठरलेले असते, पण गेले दोन वर्षापासून सभेत विविध विषयांवर मॅरेथॉन चर्चा होते. यावर्षीही ताळेबंदावर चर्चा होणारच पण त्याबरोबर संचालक मंडळाने चौदा विषय चर्चेसाठी ठेवले आहेत. त्यामध्ये पारंपारिक दहा विषय सोडले तर चार महत्वपुर्ण विषय चर्चेसाठी ठेवले आहेत.
यामध्ये एकर रकमी परतफेड दिलेल्या रक्कमेस मंजूरी देणे, कर्जमर्यादेबाबत पोटनियम दुरूस्ती, स्टाफिंग पॅटर्न मंजूरी आदी महत्वपुर्ण विषय चर्चेसाठी ठेवले आहेत.