बीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातही, आंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 03:14 PM2018-12-01T15:14:36+5:302018-12-01T15:18:53+5:30

उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या ऊस प्रजनन केंद्रात सकाळी दहा वाजता नियामक मंडळाची बैठक होत आहे.

Meeting of sugar from Beet in Maharashtra, meeting tomorrow at Amboli Breeding Center | बीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातही, आंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक

बीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातही, आंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक

Next
ठळक मुद्देबीटपासून साखर निर्मितीचा प्रयोग महाराष्ट्रातहीआंबोली प्रजनन केंद्रात उद्या बैठक शरद पवार उपस्थित राहणार

विश्र्वास पाटील 

कोल्हापूर : उसापासून साखर निर्मितीत ठसा उमटविलेला महाराष्ट्रातील साखर उद्योग आता बिटापासून साखरनिर्मितीच्या उंबरठ्यावर आहे. हा प्रयोग महाराष्ट्रात कितपत यशस्वी होईल, यासंबंधीचा विचार करण्यासाठी उद्या, रविवारी आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय)च्या ऊस प्रजनन केंद्रात सकाळी दहा वाजता नियामक मंडळाची बैठक होत आहे. 

स्वत: इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार, माजी मंत्री अजित पवार, दिलीप वळसे-पाटील,जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, राजेश टोपे, आदी सदस्य त्यास उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्रात सध्या १०१ सहकारी व ८७ खासगी कारखाने हंगाम घेतात. एक काळ असा होता की, ऊस हंगाम किमान सहा महिने चालत असे; परंतु आता कारखान्यांची वाढलेली संख्या, लवकर ऊस गाळप करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता यांमुळे गाळप हंगाम चार ते साडेचार महिन्यांवर आले आहे.

कर्नाटकात तर खासगी कारखाने ‘जे काही गाळप करायचे ते १०० दिवसांत करून घ्या,’ हा पॅटर्न राबवीत आहेत. त्यामुळे १०० दिवस हंगाम आणि वर्षाचा खर्च करावा लागत आहे. म्हणून उसाचा हंगाम झाल्यानंतर आणखी किमान दोन-तीन महिने तीच यंत्रणा वापरून आपण बिटापासून साखरनिर्मिती करू शकू का, असा विचार पुढे आला आहे.

शरद पवार व ‘व्हीएसआय’चे महासंचालक शिवाजीराव देशमुख मध्यंतरी युरोपमध्ये जाऊन बिटापासून साखरनिर्मिती कशी होते, त्यातील तंत्रज्ञान व ते महाराष्ट्रात वापरायचे झाल्यास काय करावे लागेल, हे प्रत्यक्ष पाहून आले आहेत. त्यासंबंधीचे सादरीकरण या बैठकीत होणार आहे. ‘व्हीएसआय’ राजारामबापू साखर कारखाना (वाळवा), समर्थ शुगर (जालना) येथे बीट उत्पादनाचे गेली दोन वर्षे प्रयोग घेत आहे.

यंदा तो बारामती अ‍ॅग्रो कारखान्याच्या क्षेत्रात घेतला जात आहे. वेगवेगळ्या हवामानांत हे पीक कसे येते, याचा संशोधनात्मक अभ्यास सुरू आहे. बीटपासून साखर म्हणजे ऊस बंद असे नाही तर उसाचा हंगाम संपल्यानंतर बंद ठेवाव्या लागणाऱ्या यंत्रणेचा वापर करून उत्पादन घेणे व उत्पादन खर्च कमी करणे व त्यातून शेतकऱ्यालाच चार पैसे कसे जास्त मिळतील असा यामागे विचार आहे. साखर उत्पादन जास्त झाले तरीही त्यापासून इथेनॉल करता येते; त्यामुळे त्यासाठीही घाबरण्याचे कारण नाही.

 
‘व्हीएसआय’ची वार्षिक सभा १५ डिसेंबरला पुण्यातील मांजरी येथील मुख्यालयात होत आहे. तिथेही या विषयाचे सादरीकरण केले जाणार आहे.  उद्या, रविवारी होणाऱ्या  मंडळाच्या बैठकीस ज्येष्ठ नेते कल्लाप्पाण्णा आवाडे, अरुण लाड, विजयसिंह मोहिते-पाटील, शंकरराव कोल्हे, गणपतराव तिडके, यशवंतराव गडाख, बी. जी. ठोंबरे, रोहित पवार, नरेंद्र मुरकुंबी हे उपस्थित राहणार आहेत.

एक दृष्टिक्षेप

बीट हे साडेचार ते पाच महिन्यांचे पीक असून मुख्यत: ते जास्त थंडी असलेल्या प्रदेशांत चांगले उत्पादित होते. त्यामुळे युरोपमध्ये त्यापासून साखर करणारी कारखानदारी आहे. ब्राझीलसह भारत, थायलंड, आॅस्ट्रेलिया व आफ्रिकन देशांत मुख्यत: उसापासून साखरनिर्मिती होते.
 

 

Web Title: Meeting of sugar from Beet in Maharashtra, meeting tomorrow at Amboli Breeding Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.