अंतिम वर्ष परीक्षांच्या वेळापत्रकाबाबत आज बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 04:22 AM2021-03-24T04:22:05+5:302021-03-24T04:22:05+5:30
बी. कॉम. आयटी., बँक मॅनेजमेंट, बी. एस्सी. बायोटेक, आयटी, शुगरटेक, ॲनिमेशन, बी. व्होक, आदी विविध २५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू ...
बी. कॉम. आयटी., बँक मॅनेजमेंट, बी. एस्सी. बायोटेक, आयटी, शुगरटेक, ॲनिमेशन, बी. व्होक, आदी विविध २५ अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. या अभ्यासक्रमांच्या ३५०८ विद्यार्थ्यांनी मंगळवारी विविध सत्रांमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून परीक्षा दिली. त्यात ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३४८९ इतकी होती. परीक्षेच्या कालावधीत येणाऱ्या तांत्रिक अडचणीचे निराकारण करण्यासाठी विद्यापीठाने विशेष कक्षाच्या माध्यमातून यंत्रणा कार्यन्वित केली आहे. सब्जेक्ट कोडबाबतच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यापीठाने बी. ए., बी. कॉम, आदी अभ्यासक्रमांच्या परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय रविवारी जाहीर केला होता. या परीक्षांचे वेळापत्रक निश्चित करण्यासाठी बुधवारी बैठक घेण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक गजानन पळसे यांनी सांगितले.
चौकट
शिक्षणमंत्र्यांनी घेतला आढावा
राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये सध्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामध्ये आतापर्यंत किती परीक्षा झाल्या. किती शिल्लक आहेत. निकाल कधीपर्यंत जाहीर होतील, आदींबाबतचा आढावा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ऑनलाईन बैठकीद्वारे घेतला. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाची माहिती गजानन पळसे यांनी सादर केली.