हेरलेत ग्रामस्तरीय कोरोना सनियंत्रण समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:25 AM2021-04-16T04:25:40+5:302021-04-16T04:25:40+5:30
हेरले:- कोरोना संदर्भात ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीने दिलेल्या सूचनांचे ग्रामस्थानी काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे ...
हेरले:- कोरोना संदर्भात ग्रामस्तरीय सनियंत्रण समितीने दिलेल्या सूचनांचे ग्रामस्थानी काटेकोरपणे पालन करावे. कोरोनाचे उच्चाटन करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे अन्यथा नियम मोडणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रतिपादन उपसरपंच सतीश काशीद यांनी केले. हेरले येथे ग्रामपंचायतीमध्ये आयोजित ग्रामस्तरीय कोरोना सनियंत्रण समिती बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पोलीस पाटील नयन पाटील होत्या.
गावातील किराणा दुकानदार व अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानदार यांनी सामाजिक अंतर ठेवून मालाची विक्री करत नसल्याचे निदर्शनास आले त्यामुळे भाजीपाला, दुकानदार व शेतकरी यांनी आपला भाजीपाला विकताना व दुकानातील बाजार खरेदी करत असताना योग्य अंतर ठेवून खरेदी करावे. तसेच गावांमध्ये फिरताना सर्वांनी मास्क लावून फिरावे अन्यथा विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशा सूचना सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी मांडल्या.
या बैठकीला ग्रामपंचायत सदस्य फरीद नायकवडी, मज्जीद लोखंडे,आदिक इनामदार,संदीप चौगुले,इब्राहिम खतीब, दादासाहेब कोळेकर, ,ग्रामविकास अधिकारी एस. बी. चव्हाण, तलाठी एस ए बरगाले उपस्थित होते.