ऊसदरप्रश्नी पुढील आठवड्यात पंतप्रधानांना भेटणार : राजू शेट्टी
By admin | Published: November 21, 2014 09:46 PM2014-11-21T21:46:17+5:302014-11-22T00:11:16+5:30
राज्य शासनाच्या पातळीवर चांगले निर्णय घेतले असले तरी यातून ऊसदराचा प्रश्न सुटणार नाही,
कोल्हापूर : राज्य शासनाने ऊसदराचा प्रश्न सोडविण्यासाठी पंधरा-वीस दिवसांत सकारात्मक पावले टाकली आहेत. त्यामुळे लगेच आंदोलन सुरू करणे योग्य होणार नाही, सरकारला आणखी थोडा वेळ दिला पाहिजे. त्यामुळे आणखीन काही दिवस वाट पाहून आंदोलनाचा निर्णय घेतला जाणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राज्य शासनाच्या पातळीवर चांगले निर्णय घेतले असले तरी यातून ऊसदराचा प्रश्न सुटणार नाही, यासाठी पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ पंतप्रधानांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘स्वाभिमानी’ने जयसिंगपुरातील ऊस परिषदेत काही मागण्या केल्या होत्या. त्याप्रमाणे राज्य शासनाच्या अधिकारातील बऱ्यापैकी मागण्या मान्य झाल्या आहेत. उसावरील खरेदीकर माफ केल्याने प्रतिटन १०० ते १२५ रुपये कारखान्यांना मिळणार आहेत. मळीवरील निर्बंध उठविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)