दोन्ही काँग्रेसच्या बैठकींना बोरगे, देसार्इंची हजेरी

By admin | Published: March 31, 2017 12:53 AM2017-03-31T00:53:41+5:302017-03-31T00:53:41+5:30

जिल्हा परिषदेचे राजकारण : सभापती निवडींसाठी बैठक; फूट न पडण्यासाठी सूचना; सदस्य पुन्हा सहलीवर रवाना

The meetings of both the Congress borgees, the presence of the citizens | दोन्ही काँग्रेसच्या बैठकींना बोरगे, देसार्इंची हजेरी

दोन्ही काँग्रेसच्या बैठकींना बोरगे, देसार्इंची हजेरी

Next

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीवेळी गैरहजर राहणारे राष्ट्रवादीचे शाहूवाडीतील सदस्य विजय बोरगे यांनी गुरुवारी चक्क दोन्ही कॉँग्रेसच्या बैठकांना हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. याबरोबरच गैरहजर राहिलेल्या कॉँग्रेसच्या रेश्मा देसाई यांचे पती अर्थात जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहुल देसाई यांनीही बैठकीनंतर सतेज पाटील यांची भेट घेतल्याने चर्चेला ऊत आला आहे. दरम्यान, दोन्ही कॉँग्रेसच्या सदस्यांना पुन्हा सहलीवर पाठविण्यात आले आहे.
तीन दिवसांपूर्वी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विरोधी गटातील अजूनही चार सदस्य आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. त्यामुळे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ यांनी हालचाली करीत गुरुवारी ताराबाई पार्कमधील सर विश्वेश्वरैया सभागृहामध्ये दोन्ही कॉँग्रेसच्या सदस्यांची बैठक घेतली. यावेळी कोणत्याही परिस्थितीत आपल्यात फूट पडता कामा नये याच्या स्पष्ट सूचना सदस्यांना देण्यात आल्या. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश पाटील (चंदगड), राजेश लाटकर, जयवंतराव शिंपी, बंडा माने, युवराज पाटील, भैया माने, अनिल साळोखे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सदस्य उपस्थित
होते.
विरोधकांनी कितीही वल्गना केल्या तरी आपली संख्या एकानेही कमी न होता वाढलीच पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. अध्यक्ष निवडीवेळी अनुपस्थित असलेले बोरगे गुरुवारी पहिल्या रांगेत बसले आहेत. एका सदस्याने संंख्या वाढली आहे. आता राहुल देसाईसुद्धा खाली आले आहेत. तेव्हा कुणीही वेगळा विचार करू नये, अशा पद्धतीने कडक सूचना यावेळी देण्यात आल्या. बैठकीनंतर सर्वच सदस्यांना लक्झरी बसमधून सहलीवर पाठविण्यात
आले असून, रविवारी (दि. २) संध्याकाळी ही सर्व मंडळी आता कोल्हापुरात परतणार आहेत.


सदस्यांना ‘व्हीप’ लागू
दोन्ही कॉँग्रेसच्या उपस्थित सदस्यांना गुरुवारीच पक्षाचा
‘व्हीप’ लागू करण्यात आला. त्यासाठी सतेज पाटील यांनी यंत्रणा कामाला लावली होती. पुन्हा नंतर व्हीप लागू करताना धावपळ होते; म्हणून या बैठकीतच सदस्यांच्या सह्या घेऊन त्यांना व्हीप लागू
करण्यात आला.
कार्यकर्ते, नातेवाइकांनाही काढले बाहेर
बैठक सुरू असताना जिल्हा परिषदेच्या सदस्यांचे नातेवाईक आणि काही कार्यकर्तेही आत बसून होते. मात्र, सुरुवातीला सतेज पाटील आले. नंतर मुश्रीफ आले. त्यानंतर कार्यकर्ते आणि नातेवाइकांनाही बाहेर काढून सक्त शब्दांत सदस्यांना सूचना देण्यात आल्या. यानंतर सदस्य थेट लक्झरीतच बसले.


‘भोगावती’मुळे पी. एन. अनुपस्थित
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील हे भोगावती साखर कारखान्यासंदर्भात देवाळे येथे मेळावा असल्याने आले नसल्याचे यावेळी सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे संजय मंडलिक आणि आमदार प्रकाश आबिटकर यांचे सदस्य सहलीवर जाणार नसल्याचे कळले.
मी आलो, मतदार आणलाय का?
बैठकीच्या ठिकाणी शाहूवाडीचे विजय बोरगे उपस्थित आहेत, असे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. याचदरम्यान खाली राहुल देसाई आले होते. ते बैठकीनंतर सतेज पाटील यांना भेटणार होते. याबाबत देसाई यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, ‘निरोप आलाय म्हणून आलोय; पण मी एकटाच आलोय. मतदार आणलाय का?’ असा प्रतिप्रश्न त्यांनी केला.

Web Title: The meetings of both the Congress borgees, the presence of the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.