सहकारी संस्थांच्या सभा ऑनलाईनच जिल्हाधिकारी दौलत देसाई : ५० सभासद संख्येचा निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:44 AM2021-03-13T04:44:03+5:302021-03-13T04:44:03+5:30

कोल्हापूर : ज्या सहकारी संस्थांच्या सभासदांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे, अशा संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ...

Meetings of co-operative societies online only District Collector Daulat Desai: Criteria for 50 members | सहकारी संस्थांच्या सभा ऑनलाईनच जिल्हाधिकारी दौलत देसाई : ५० सभासद संख्येचा निकष

सहकारी संस्थांच्या सभा ऑनलाईनच जिल्हाधिकारी दौलत देसाई : ५० सभासद संख्येचा निकष

Next

कोल्हापूर : ज्या सहकारी संस्थांच्या सभासदांची संख्या ५० पेक्षा जास्त आहे, अशा संस्थांनी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ओएव्हीएमद्वारे घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले. ज्या संस्थांची सभासद संख्या ५० पेक्षा कमी आहे, त्या संस्था मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रत्यक्ष सहभागाद्वारे वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊ शकतील.

आगामी काळात अनेक सहकारी संस्थांच्या निवडणुका होत आहेत; शिवाय वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहेत. कोरोनाचे संकट अजून टळलेले नाही; शिवाय रुग्णांची संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी वरील आदेश काढले आहेत. त्यानुसार सभेची नोटीस संस्थेच्या नोटीस बोर्ड, शाखांची कार्यालये येथे लावण्यात यावी. ज्या सभासदांचे ईमेल पत्ते किंवा संपर्कासाठी मोबाईल क्रमांक नसतील अशांना बैठकीत चर्चेसाठी असणाऱ्या विषयांबाबतची माहिती पत्राद्वारे पोहोच करावी. कार्यक्षेत्रानुसार स्थानिक वर्तमानपत्रात त्याची जाहिरात द्यावी. सभा व्हीसी किंवा ओएव्हीएम यापैकी कोणत्या माध्यमाद्वारे घेण्यात येणार आहे, सभेचा दिनांक व वेळ, सभासदांचे ईमेल आयडी किंवा मोबाईल क्रमांक, त्याबाबतची माहिती कोठे सादर करावी, याबाबतचा तपशील नमूद करावा. सभेचे कामकाज तज्ज्ञ व्यक्ती/ एजन्सीमार्फत पार पाडावे. त्यासाठी मराठी सॉफ्टवेअर असलेल्या एजन्सीला प्राधान्य द्यावे. सभेचे अभिलेख जतन करून ठेवावेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

---

Web Title: Meetings of co-operative societies online only District Collector Daulat Desai: Criteria for 50 members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.