मेघोली तलाव फुटल्याने बाधित वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:30 AM2021-09-08T04:30:43+5:302021-09-08T04:30:43+5:30

कोल्हापूर : मेघोली (ता. भुदरगड) येथील तलाव फुटल्याने तीन गावांसह चार वाड्यांचा बाधित झालेला वीजपुरवठा महावितरणने शर्थीचे प्रयत्न करत ...

Megholi lake burst disrupted power supply in two days | मेघोली तलाव फुटल्याने बाधित वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत

मेघोली तलाव फुटल्याने बाधित वीजपुरवठा दोन दिवसांत सुरळीत

Next

कोल्हापूर : मेघोली (ता. भुदरगड) येथील तलाव फुटल्याने तीन गावांसह चार वाड्यांचा बाधित झालेला वीजपुरवठा महावितरणने शर्थीचे प्रयत्न करत अवघ्या दोन दिवसांत पूर्ववत केला. महावितरणच्या तत्परतेमुळे या भागातील ५५० वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत झाला आहे.

गेल्या बुधवारी भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याची घटना घडली. या घटनेमुळे मेघोली गावठाण फिडरवरील ३० उच्चदाब वीज खांब, एक वितरण रोहित्र व ३ लघुदाब वीज खांब पडले. त्यामुळे सोनुर्ली, मेघोली, नवाले या गावांसह गडदुवाडी, रब्बेबाडी, तालकरवाडी व धनगरवाडा या वाड्यांचा वीजपुरवठा बाधित झाला. चिखल- गाळ, पाण्याची पर्वा न करता चिखलात फसलेल्या वीजवाहिन्या ओढून काढणे, डोक्यावरून वीज खांबांची वाहतूक करणे, वीज खांब उभे करुन वीज तारा ओढणे ही कामे करून वीजपुरवठा पूर्ववत केला. उपविभागीय अभियंता दिगंबर पोवार, शाखा अभियंता विवेक मोरे यांनी मेघोलीचा वीजपुरवठा सुरळीत करण्याची कामगिरी पार पाडली.

चौकट

महावितरणचे आपत्ती नियोजन प्रभावी

कोरोना, महापूर अशा प्रसंगात महावितरणच्या यंत्रणेने सुरळीत वीजसेवेसाठी सदैव तत्परता दाखविली आहे. त्याच पद्धतीने मेघोली दुर्घटनेनंतर महावितरणने अविश्रांत मेहनत घेऊन त्या भागातील बाधित वीजपुरवठा अतिशीेघ्र सुरळीत करण्यात यश मिळविले. यातून आपत्तीचे नियोजन प्रभावी असल्याचे महावितरणने पुन्हा सिद्ध केले आहे.

फोटो: ०७०९२०२१-कोल-महावितरण ०१, ०२

फोटो ओळ : महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळाने तत्परता दाखवत अवघ्या दोन दिवसांत मेघोली तलाव फुटल्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करून नागरिकांना मोठा दिलासा दिला.

Web Title: Megholi lake burst disrupted power supply in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.