मायणीच्या खेळाडूचा केरळमध्ये मृत्यू
By admin | Published: February 2, 2015 10:50 PM2015-02-02T22:50:50+5:302015-02-02T23:45:47+5:30
मयुरेशचा मृतदेह मंगळवारी गावात : नेटबॉल सामन्यानंतर बीचवर दुर्घटना
सातारा : ‘स्पोर्टस इज लाईफ’ असं वाक्य खेळाडूंच्या तोंडी नेहमीच पाहायला मिळतं. मात्र, क्रीडा नैपुण्याच्या शिखरावर असताना ‘लाईफ ल्ााईन’ तुटण्याचा दुर्दैवी प्रकार मायणी (ता. खटाव) येथील मयुरेश भगवान पवार (वय २0) या खेळाडूच्याबाबतीत घडला. केरळ येथील राष्ट्रीय स्पर्धेतील येथील बिचवर त्याचा मृत्यू ाला. सुरुवातीला ह्रदयविकाराने त्याचा मृत्यू झाला, असे सांगण्यात येत होते, मात्र शवविच्छेदन अहवालानंतर पाण्यात बुडून मयुरेशचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या या चटका लावणाऱ्या मृत्यूमुळे अवघे मायणी गाव स्तब्ध झाले आहे.त्रिवेंद्रम (केरळ) येथील अॅग्रिकल्चर कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेतील ‘महाराष्ट्र विरुद्ध चंदीगढ’ हा सामना सोमवारी (दि.२) दुपारी १२ वाजता होता. संपूर्ण स्पर्धेत आपल्या चपळतेचं दर्शन घडविणाऱ्या मयुरेशच्या नेत्रदीपक खेळाचं दर्शन याही स्पर्धेत पाहायला मिळालं. सामन्यानंतर मयुरेशसह महाराष्ट्र संघातील मायणीच्या खेळाडूचा केरळमध्ये मृत्यू इतर खेळाडू बीचवर फिरायला गेले होते. त्याला दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.मयुरेश हा अत्यंत हरहुन्नरी खेळाडू. मायणी या त्याच्या गावापासूनच त्याने नेटबॉल खेळात चमक दाखविली. त्याचे प्रशिक्षक श्रीमंत कोकरे यांनी त्याच्यातील चमक ओळखून त्याला शालेय संघात घेतले. मायणीतल्या भारतमाता विद्यालयात त्याचे माध्यमिक शिक्षण झाले. पुढे तो साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट सायन्समध्ये दाखल झाला. ११ वी व १२ वी सुरू असतानाच त्याने नेटबॉलचाही सराव सुरू ठेवला. यानंतर पुण्यातील काशीबाई नवले इंजिनिअरिंग महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवीसाठी प्रवेश घेतला. सध्या तो अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षात शिकत होता. सातारा येथील छ. शाहू जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर झालेल्या राज्यस्तरीय नेटबॉल स्पर्धेतून मयुरेशची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. मयुरेश सलग आठ-नऊ वेळा राष्ट्रीय स्पर्धा खेळला आहे. त्याचे वडील मायणी अर्बन बँकेत शाखाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर आई गृहिणी आहेत. धाकटा भाऊ आकाश याचे विटा, ता. खानापूर येथील डिप्लोमाचे शिक्षण सुरूआहे.
राज्य संघातून निवड
मायणी : महाराष्ट्र नेटबॉल असोसिएशनतर्फे महाराष्ट्राच्या संघातून मायणीतील मयुरेश पवार व गणेश चौधरी या दोन नेटबॉल खेळाडूंची निवड झाली होती. मयुरेशचा नागपूर येथे २२ ते ३० जानेवारीपर्यंत सराव शिबीर झाले. त्यानंतर दि. ३० व ३१ जानेवारी रोजी इंजिनिअरिंगचा त्याने पेपर दिला. दि. ३१ रोजी तो केरळला गेला होता. मयुरेशचे पार्थिव मंगळवारी (दि. ३) सकाळी ९ वाजता विमानाने मुंबईत आणले जाणार आहे. तिथून ते वाहनाने मायणीत आणले जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.