‘भोगावती’च्या सभासद, कर्मचाऱ्यांच्या हितासाठी वचनबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 04:39 AM2020-12-12T04:39:50+5:302020-12-12T04:39:50+5:30
भोगावती : भोगावती साखर कारखान्याची वाटचाल सभासदांच्या हिताची सुरू आहे. त्यामुळे सभासदांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असून, यंदाच्या ...
भोगावती : भोगावती साखर कारखान्याची वाटचाल सभासदांच्या हिताची सुरू आहे. त्यामुळे सभासदांनी आमच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविणार असून, यंदाच्या हंगामात साडेपाच लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आम्ही पार करू, असा विश्वास असे आवाहन भोगावती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी.एन.पाटील-सडोलीकर यांनी शुक्रवारी केले.
परिते (ता.करवीर) येथील भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या चालू गळीत हंगामातील १ लाख २१ हजार १ व्या साखर पोती पूजनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी कारखान्याचे संचालक धीरज डोंगळे यांच्या हस्ते साखर पोत्याचे पूजन करण्यात आले. चालू हंगामात कारखान्याने २५ दिवसांत एक लाख १० हजार २९० मे. टन ऊसगाळप करून एक लाख २१ हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. सध्या सरासरी साखर उतारा ११.०१ आहे. कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, सर्व संचालक, कार्यकारी संचालक के. एस. चौगले यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, सभासद मान्यवर उपस्थित होते.
फोटो ओळी : ११ भोगावती साखर पूजन
शाहूनगर परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याच्या एक लाख एकवीस हजार एकाव्या साखर पोत्याच्या पूजनप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर, उपाध्यक्ष उदयसिंह पाटील-कौलवकर, संचालक मंडळ कार्यकारी संचालक के. एस. चौगले व मान्यवर. (छाया : संजय नकाते)