वारणा बँक-‘मोतिलाल’मध्ये सामंजस्य करार - पहिलीच नागरी सहकारी बँक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 07:55 PM2018-12-18T19:55:58+5:302018-12-18T20:00:09+5:30
वारणानगर : वारणा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी डिमॅट अकौंटंटची सुविधा कार्यान्वित केली आहे. याबाबतचा सामंजस्य करार मे. मोतिलाल ओसवाल सिक्युरिटीज ...
वारणानगर : वारणा बँकेने आपल्या ग्राहकांसाठी डिमॅट अकौंटंटची सुविधा कार्यान्वित केली आहे. याबाबतचा सामंजस्य करार मे. मोतिलाल ओसवाल सिक्युरिटीज कंपनी लि., व वारणा बँक यांच्यामध्ये सोमवारी कंपनीच्या कार्यालयात मुंबईत झाला.
याप्रसंगी वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, सिक्युरिटीज कंपनीच्यावतीने मोतिलाल ओसवाल, कंपनीचे एम. डी. अँड सीईओ अजय मेनन, मे. मोतिलाल ओसवाल सिक्युरिटीज कंपनीचे भागीदार व मे. ट्रेड नेटचे संचालक समीर कुलकर्णी, वारणेचे युवानेते विश्वेश कोरे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सार्दळ तसेच चीफ मॅनेजर जयदीप पाटील हे उपस्थित होते.
वारणा बँकेचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागामध्ये विभागले असून, या नवीन सेवेचा उपयोग प्रामुख्याने ग्रामीण शाखांतील ग्राहकांना होणार आहे. ही सेवा ‘विदाऊट रिस्क पार्टीसिपेशन’ या तत्त्वाच्या आधारे देण्यात येणार आहे. यामुळे बँकेचा नॉन फंड इन्कम वाढणार असून, बँकेच्या एकूण सेव्हिंग व करंट डिपॉझिट (कासा डिपॉझिट)मध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. ग्राहकांना अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध करून देणारी वारणा बँक ही पहिलीच नागरी सहकारी बँक आहे.
वारणा बँकेच्या नवीन डिमॅट सेवेच्या सामंजस्य कराराप्रसंगी वारणा बँकेचे चेअरमन निपुण कोरे, सिक्युरिटीज कंपनीचे मोतिलाल ओसवाल, कंपनीचे एम.डी. अँड सीईओ अजय मेनन, समीर कुलकर्णी, विश्वेश कोरे, राजेश सार्दळ, जयदीप पाटील उपस्थित होते.