लोकशाहिर "अण्णा भाऊं"चे स्मारक त्यांच्या आजोळी व्हावे
By admin | Published: June 16, 2017 03:30 PM2017-06-16T15:30:12+5:302017-06-16T15:30:12+5:30
तळसंदे ग्रामस्थांचे तहसीलदारांना निवेदन
आॅनलाईन लोकमत
नवेपारगाव ( जि. कोल्हापूर) , दि. १७ : प्रतिभासंपन्न व थोर साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंचे तळसंदे (ता.हातकणंगले) या त्यांच्या आजोळ गांवी स्मारक उभारण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन तळसंदे ग्रामस्थांतर्फे डेमोक्रेटिक पार्टी आॅफ इंडियाने तहसीलदार वैशाली राजमाने यांना दिले.
अवघ्या दीड दिवसाच्या शिक्षणाच्या शिदोरीवर प्रतिभा व निरिक्षण क्षमतेच्या जोरावर त्यांनी तत्कालीन प्रस्थापित अन्यायी व्यवस्थेविरुध्द साहित्य निर्माण केले. बहुजन समाजाची जागृती करणारे महान साहित्यिक अण्णा भाऊ साठे यानी वंचीत,उपेक्षित व शोषित समाजघटकांच्या वास्तव जीवनकथा वाचकांसमोर मांडल्या.विद्रोही चळवळ जीवंत ठेवण्याचे प्रभावी कार्य केले.
लोकशाहिर अण्णा भाऊ यानी ३५ कादंबऱ््या,१५पोवाडे, १३ लोकनाट्ये,८ चिञपटांच्या पटकथा, ३ नाटके,१ प्रवासवर्णन,१३ कथासंग्रह, व १ शाहिरी पुस्तक इतकी विपुल साहित्य निमिर्ती केली.जगातील इंग्रजी,फ्रेंच,डच,रशियन आदी २७ भाषांत त्यांचे साहित्यअणुवादित झाले.मुंबईतील गिरणी कामगारां च्या प्रश्नांवरील आंदोलनाचे नेतृत्व,संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवामुक्ती संग्राम चळवळीत त्यानी क्रांतिकारी विचारांची पेरणी केली होती.
तळसंदे गावामध्ये जागा उपलब्ध करुन संबंधित वरिष्ठाना आपल्या भावना कळवणार असल्याचे यावेळी तहसीलदार वैशाली राजमाने यानी शिष्टमंडळाला त्यानी अश्वासन दिले.
निवेदनावर डीपीआयचे तालुका प्रमुख राजु सुवासे, विजय सुवासे, सचीन बल्लाळ, राजु शिंदे, विकास जाधव, दिलीप कांबळे, हिंदुराव सुवासे, विष्णु सुवासे, नंदु साठे, दिलीप दबडे, बाबासो रेंदाळकर, दिनेश बल्लाळ, बाबासो पाटोळे, जयश्री मोहिते, मंगल सुवासे, शोभा सुवासे, अनिता चांदणे आदींच्या सह्या आहेत.