मानसिक आजार व मानसिक समस्या दोन्ही भिन्न गोष्टी-सोनल जोशी यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2021 04:27 AM2021-08-28T04:27:31+5:302021-08-28T04:27:31+5:30
कोल्हापूर : मानसिक आजार व मानसिक समस्या या दोन भिन्न गोष्टी आहेत. मानसिक समस्यामध्ये औषध घेणे जरूरी नसते, ...
कोल्हापूर : मानसिक आजार व मानसिक समस्या या दोन भिन्न गोष्टी आहेत. मानसिक समस्यामध्ये औषध घेणे जरूरी नसते, असे विचार सायकोलॉजीस्ट सोनल जोशी यांनी मांडले.
कोल्हापूर जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन, रोटरी समाजसेवा केंद्र व रोटरी क्लब कोल्हापूर यांच्यातर्फे रोटरी हॉलमध्ये मेंटल अवेरनेस व रिलेशनशिप मॅनेजमेंट या विषयावर सेमिनार झाला. अध्यक्षस्थानी जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्ष डॉ. उषा निंबाळकर होत्या. यावेळी जोशी यांनी मानसिकस्वास्थ्य व शरीरस्वास्थ्य एकमेकांशी कसे संलग्न आहेत ,डॉक्टर व पेशंट यांच्यातील संबंध याविषयी विवेचन केले.
डॉ. निंबाळकर यांनी सध्याच्या अस्थिर वातावरणात सर्व काही सोयी-सुविधा असूनही माणूस बेचैन झाला आहे. डिप्रेशन, एकटेपणा, नात्यातील गैरविश्वास वाढत आहेत, यासाठी न लाजता वैद्यकीय मदत घेऊन त्याच्याशी सामना करण्याची गरज आहे, असे सांगितले. यावेळी रोटरी अध्यक्ष राजेंद्र देशिंगे यांनी रोटरीतर्फे दिल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेचा आढावा घेतला. यावेळी डॉ. उद्यम व्होरा,डॉ. शीतल पाटील, डॉ. हर्षवर्धन जगताप, डॉ. शिवराज जितकर, डॉ. शुभांगी पार्टे, रोटरी सेक्रेटरी मेघराज चुग, कुशल राठोड, प्रदीप कर्नाडे आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार डॉ. महादेव जोगदंडे यांनी मानले.