दयावान ग्रुपची साऊंड सिस्टीम जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:25 AM2021-09-21T04:25:36+5:302021-09-21T04:25:36+5:30

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत बेकायदेशीर ध्वनीक्षेपकाचा वापर करून रस्त्यावर गोंधळ घातल्याबद्दल ताराबाई रोडवरील दयावान ग्रुपच्या २८ कार्यकर्त्यांवर रविवारी ...

Merciful group's sound system confiscated | दयावान ग्रुपची साऊंड सिस्टीम जप्त

दयावान ग्रुपची साऊंड सिस्टीम जप्त

Next

कोल्हापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत बेकायदेशीर ध्वनीक्षेपकाचा वापर करून रस्त्यावर गोंधळ घातल्याबद्दल ताराबाई रोडवरील दयावान ग्रुपच्या २८ कार्यकर्त्यांवर रविवारी रात्री जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडील सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे साऊंड सिस्टीम, विद्युत रोषणाईचे साहित्य जप्त केले.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रतिबंधीत आदेश दिला आहे. तरीही ताराबाई रोडवरील आझाद हिंद तरुण मंडळ प्रणित दयावान ग्रुपच्या कर्यकर्त्यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळानजीक विद्युत रोषणाईचा व ध्वनीक्षेपकाचा वापर करून बेकायदेशीररित्या कार्यकर्ते जमवले. त्यानंतर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर गोंधळ घालत जल्लोष केला. याप्रकरणी पोलिसांनी सुमारे ७५ हजारांचे साहित्य जप्त केले. या कारवाईत सुरेश बाळू सुतार, महेश हिंदुराव चौगुले, प्रमोद सुतार, मानसिंग पवार, अजिंक्य सूर्यवंशी, प्रथमेश मोरे, स्वप्नील सूर्यवंशी, प्रथमेश मोरे, स्वप्नील लोहर, वैभव सूर्यवंशी, प्रणव मोरे, यश सुतार, तेजस मोरे, शुभम तोडकर, अतुल महादेव शिंदे, सतीश पांडुरंग सुतार, समीर वसंत वर्णे, योगेश वसंत पाटील, अक्षय संजय साबळे, विद्युत रोषणाईचे मालक इंद्रजीत एैनापरकर (सर्व रा. फुलेवाडी) यांच्यावर गुन्हा दखल झाला आहे.

Web Title: Merciful group's sound system confiscated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.