मरळीच्या मुलाचा खून पैशाच्या वादातून: विश्वास लोहारची कबुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 01:52 AM2017-11-14T01:52:22+5:302017-11-14T01:55:56+5:30
कोल्हापूर : मरळी (ता. पन्हाळा) येथील प्रदीप सरदार सुतार (वय ९) या शाळकरी मुलाचा खून आर्थिक व्यवहारातून केल्याची कबुली
कोल्हापूर : मरळी (ता. पन्हाळा) येथील प्रदीप सरदार सुतार (वय ९) या शाळकरी मुलाचा खून आर्थिक व्यवहारातून केल्याची कबुली संशयित आरोपी पप्पू ऊर्फ विश्वास बंडू लोहार (२३, रा. तिसंगी, ता. गगनबावडा) याने दिली; परंतु घटनास्थळावरून व आरोपीच्या चौकशीतून प्रदीपचे लैंगिक शोषण झाल्याचेही तपासात पुढे आले आहे.
त्यानुसार संशयिताची वैद्यकीय तपासणी करून डीएनए चाचणीसाठी काही नमुने मुंबईच्या फॉरेन्सिक लॅबला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे, अशी माहिती सोमवारी वरिष्ठ अधिकाºयांनी दिली.
संशयित विश्वास लोहार याने चौकशीत सांगितले, की सरदार सुतार माझा मावसभाऊ आहे. त्याने माझ्या वडिलांना घरबांधणीसाठी ४६ हजार रुपये दिले होते. त्यातील १५ हजार रुपये परत केले. उर्वरित ३१ हजार रुपयांची तो वारंवार मागणी करीत होता. आमचे एकमेकांच्या घरी येणे-जाणे होते. सरदार सुतार याने चार लोकांसमोर वडिलांकडे व माझ्याकडे पैसे मागून अपमान केला होता. त्याचा राग माझ्या मनात होता. त्यातूनच आपण त्याचा मुलगा प्रदीप याचा काटा काढण्यासाठी आठवडाभर प्लॅन करीत होतो. रविवारी (दि.५) दुपारी मरळी येथून प्रदीपला कोल्हापूरला घेऊन आलो. त्याला रंकाळा परिसरात फिरवत रात्री आठच्या सुमारास खणीत ढकलून दिले. तेथून मरळीचे लोक मला मारतील, या] भीतीने टिंबर मार्केट येथील बहिणीच्या तानाजी सुतार यांच्या घरी गेलो होतो, अशी कबुली दिल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाºयांनी सांगितले.
दरम्यान, संशयित लोहार हा पहिल्यापासून चौकशीमध्ये विसंगत माहिती देऊन तपासाला वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या विकृत वर्तनावरून तो प्रदीपचे लैंगिक शोषण करीत असल्याचे तपासात पुढे आले आहे. यापूर्वीही त्याने मारण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे. घटनास्थळावरील काही दृश्ये संशयास्पद असल्याने संशयिताचे व मृतदेहाचे काही नमुने घेऊन ते मुंबईला पाठविले आहेत. हा रिपोर्ट आल्यानंतर नेमके कारण स्पष्ठ होईल.
आठवडाभर आधीपासून तयारी
सरदार सुतार याने चार लोकांसमोर विश्वासच्या वडिलांकडे व त्याच्याकडे पैसे मागून अपमान केला होता. त्याचा राग विश्वासच्या मनात होता. त्यातूनच सरदार यांचा मुलगा प्रदीप याचा काटा काढण्यासाठी आठवडाभर प्लॅन केला होता, असे त्यांने सांगितले.