कोल्हापूरचा पारा वाढतोय, ३८ डिग्रीपर्यंत तापमान : सकाळी मात्र थंड हवा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 04:42 PM2018-02-26T16:42:11+5:302018-02-26T16:42:11+5:30

गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात हळू-हळू वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात ३८ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले असून गतआठवड्यापेक्षा ७ ते ८ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे. सकाळी दहानंतर तापमान वाढत जात असले तरी सकाळी मात्र अजून थोडीशी थंड हवा आहे.

The mercury of Kolhapur is growing, temperature up to 38 degrees: in the morning it is still cold air | कोल्हापूरचा पारा वाढतोय, ३८ डिग्रीपर्यंत तापमान : सकाळी मात्र थंड हवा कायम

कोल्हापूरचा पारा वाढतोय, ३८ डिग्रीपर्यंत तापमान : सकाळी मात्र थंड हवा कायम

Next
ठळक मुद्देकोल्हापूरचा पारा वाढतोय३८ डिग्रीपर्यंत तापमान सकाळी मात्र थंड हवा कायम

कोल्हापूर : गेल्या आठ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्याच्या तापमानात हळू-हळू वाढ होऊ लागली आहे. दिवसभरात ३८ डिग्रीपर्यंत तापमान पोहोचले असून गतआठवड्यापेक्षा ७ ते ८ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे. सकाळी दहानंतर तापमान वाढत जात असले तरी सकाळी मात्र अजून थोडीशी थंड हवा आहे.

यंदा पावसाबरोबरच थंडीचा कडाकाही अनुभवयास मिळाला. साहजिकच तीव्र उन्हाळ्याचा अनुभवही येणार हे निश्चित आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात वाढ होत गेली. गेल्या आठवड्यात साधारणपणे जिल्ह्याचे किमान तापमान २० तर कमाल ३१ डिग्रीपर्यंत होते. त्यात हळूहळू वाढ होत असून सोमवारी ते ३८ डिग्रीपर्यंत पोहोचले आहे.

अजूनही पहाटे गार वारे वाहत असल्याने थंडी वाजते पण सुर्यनारायण जसा वर येत राहतो, तसे तापमान वाढत जाते. सकाळी दहा वाजल्यापासून तर अंग भाजण्यास सुरुवात होते. सूर्य डोक्यावर आल्यानंतर तर घराबाहेर पडणे नको वाटते. हा पारा दुपारी दोनपर्यंत कायम राहतो. त्यानंतर वातावरणात हळूहळू बदल होऊन तापमान कमी होते, रात्री आठनंतर मात्र गार वारे वाहते.

आपल्याकडे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासून पारा चढत राहतो, पण यंदा फेब्रुवारीतच अंग भाजून निघत आहे. गेल्यावर्षी २६ फेब्रुवारीला किमान २१ तर कमाल ३२ डिग्रीपर्यंत तापमान होते. गेल्यावर्षीपेक्षा ६ डिग्रीने तापमानात वाढ झाली आहे.

गेल्यावर्षी दि. २० ते २८ फेब्रुवारीपर्यंत कमाल तापमान सरासरी ३३ डिग्रीपर्यंत राहिले. त्याच कालावधीत यावर्षी ३७ डिग्रीपर्यंत तापमान राहिले आहे. आगामी आठ दिवसांचा तापमानाचा अंदाज पाहिला तर कमाल तापमान ३८ डिग्रीवर राहील पण किमान तापमानात वाढ होणार असल्याने उष्मा वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

शेतातील कामावर परिणाम

सध्या ऊसतोडणीसह पिकांच्या भांगलणीचे काम सुरू आहे. उष्मा वाढला की या कामावर परिणाम होत आहे. ऊसतोडणी मजुरांना त्याचा फटका जास्त बसत असून सकाळी अकराच्या पुढे ऊस तोडणे मुश्कील होते.

तुलनात्मक तापमान असे-

फेब्रुवारी                   २०१७
दिनांक               किमान               कमाल

२४ फेब्रुवारी                   २१               ३५
२५  फेब्रुवारी                  २१              ३४
२६ फेब्रुवारी                   २०              ३२
२७ फेब्रुवारी                   २०              ३३
२८ फेब्रुवारी                   २३             ३५

फेबुवारी २०१८
दिनांक                   किमान        कमाल

२४ फेब्रुवारी                   २२           ३५
२५ फेब्रुवारी                   २२           ३६
२६ फेब्रुवारी                   १९          ३८
२७ फेब्रुवारी                   २१         ३८
२८ फेब्रुवारी                   २१         ३८

 

Web Title: The mercury of Kolhapur is growing, temperature up to 38 degrees: in the morning it is still cold air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.