मर्लिन डिसिल्वा ‘मिस उत्कर्ष’ची विजेती

By admin | Published: January 29, 2015 10:02 PM2015-01-29T22:02:34+5:302015-01-29T23:37:41+5:30

सातार्डा येथे स्पर्धा : समृद्धी पेडणेकर द्वितीय, दुर्वा साळोखे तृतीय

Merlin De Silva wins 'Miss Utkarsh' | मर्लिन डिसिल्वा ‘मिस उत्कर्ष’ची विजेती

मर्लिन डिसिल्वा ‘मिस उत्कर्ष’ची विजेती

Next

सातार्डा : सातार्डा येथील उत्कर्ष कला, क्रीडा व विकास मंडळ आयोजित ‘सातार्डा मिस उत्कर्ष’ची विजेती मडगाव येथील मर्लिन डिसिल्वा ठरली. तिला मानाचा मुकुट आणि रोख आठ हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तसेच द्वितीय क्रमांक समृद्धी पेडणेकर (वेंगुर्ले) व तृतीय क्रमांक दुर्वा साळोखे (कोल्हापूर) हिने मिळविला.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर, गोव्याचे जिल्हा परिषद सदस्य दीपक कळंगुटकर, सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये, उपसरपंच रुपवती मयेकर, ग्रामपंचायत सदस्य भावना वेंगुर्लेकर, एन. डी. कांबळे, महेंद्र मातोंडकर, मिताली मातोंडकर, मयूरी राणे यांच्या उपस्थितीत झाले.
बेस्ट हेअर स्टाईल-क्षितिजा गोवेकर, बेस्ट स्माईल- नम्रता सावंत (वेंगुर्ले), बेस्ट कॅटवॉक- अश्विनी शिवडे (रत्नागिरी) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. भक्ती जामसंडेकर व अश्विनी शिवडे यांना उत्तेजनार्थ बक्षिसांनी गौरविण्यात आले. यावेळी आयोजित केलेली ग्रुप डान्स स्पर्धा अतिशय रोमांचक झाल्याने तिन्ही पारितोषिके विभागून देण्यात आली. यामध्ये प्रथम क्रमांक डायमंड डान्स गु्रप, रत्नागिरी व सिद्धार्थ डान्स ग्रुप, मडगाव, द्वितीय क्रमांक बीओडी ग्रुप, पर्वरी व ए रॉकर्स ग्रुप, कुडाळ तसेच तृतीय क्रमांक सिद्धार्थ ग्रुप पिंगुळी व जिल्हा परिषद शाळा, कास यांना विभागून देण्यात आला.
बक्षीस वितरणप्रसंगी जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश कवठणकर, सातार्डा सरपंच उदय पारिपत्ये, महेंद्र मातोंडकर, गीताली मातोंडकर, एन. डी. कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रवीण मांजरेकर, प्रिया कदम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सागर राऊळ, शैलेश मेस्त्री, वासुदेव राऊळ, सर्वेश पेडणेकर, अक्षय पेडणेकर व सातार्डा ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली. (वार्ताहर)

Web Title: Merlin De Silva wins 'Miss Utkarsh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.