मेश कत्तींना मंत्रिपदामुळे संकेश्वरात जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:20 AM2021-01-15T04:20:47+5:302021-01-15T04:20:47+5:30
संकेश्वर : बहुप्रतीक्षित कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर गुरुवारी झाला. हुक्केरी (संकेश्वर)चे आमदार उमेश कत्ती यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने ...
संकेश्वर : बहुप्रतीक्षित कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर गुरुवारी झाला. हुक्केरी (संकेश्वर)चे आमदार उमेश कत्ती यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्याने भाजप कार्यकर्त्यांनी शहरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला.
राज्यपाल वजुभाई वाला यांनी उमेश कत्तींना राजभवनात मंत्रिपदाची शपथ दिली. येडीयुराप्पा यांच्या मंत्रिमंडळात सात नवीन चेहऱ्यांना संधी दिली असून, आमदार कत्ती यांची लिंगायत कोट्यातून ज्येष्ठ आमदार म्हणून कॅबिनेट मंत्री म्हणून निवड झाली आहे.
वडील कै. विश्वनाथ कत्तींचे १९८५ मध्ये निधन झाल्याने पोटनिवडणुकीत जनता पक्षातून हुक्केरी क्षेत्रात ते प्रथम आमदार बनले. १९८५ व १९९४ निधर्मी जनता दलातून आमदार होऊन जे. एच. पटेल यांच्या काळात साखर व सार्वजनिक बांधकाम मंत्री, १९९९ मध्ये चौथ्यांदा जनता दलातून आमदार. २००८ मध्ये पाचव्यांदा 'निजद'मधून आमदार. मात्र, दोन महिन्यांत राजीनामा देऊन भाजप येडीयुरप्पा सरकारमध्ये सामील होऊन कारागृहमंत्री झाले होते. २००९ मध्ये सहाव्यांदा भाजपतून आमदार, सदानंदगौडा व जगदीश शेट्टर मंत्रिमंडळात कृषिमंत्री, भाजपमधून २०१३ ला सातव्यांदा, तर २०१७ मध्ये आठ वेळेला आमदार बनले. आतापर्यंत कत्तींनी नऊ वेळा निवडणूक लढविली असून, आठवेळा आमदार झाले; पण २००४ च्या निवडणुकीत शशिकांत नाईक यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला होता.
फोटो ओळी : बंगलोर येथील राजभवनात राज्यपाल वजुभाई वाला यांनी उमेश कत्ती यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
क्रमांक : १४०१२०२१-गड-०१