यमाच्या प्रतिकृतीतून कोरोना प्रतिबंधाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:19 AM2021-05-03T04:19:57+5:302021-05-03T04:19:57+5:30
कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत कल्लाप्पा जंगम यांनी यमाची रेड्यावर बसलेली दहा फूट उंचीची प्रतिकृती तयार करून ...
कोल्हापूर : सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत कल्लाप्पा जंगम यांनी यमाची रेड्यावर बसलेली दहा फूट उंचीची प्रतिकृती तयार करून कोरोना प्रतिबंधाचा संदेश दिला आहे. मास्क वापरा, हात धुवा, महत्त्वाच्या कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नका, असा संदेश देणारी यमाची ही प्रतिकृती आहे. जंगम यांनी शासनाचा कोरोनाला दूर ठेवण्याबाबतचा संदेश या माध्यमातून लोकांपर्यंत पोहाेचविण्याचा प्रयत्न केला आहे.
जंगम यांनी शासनाच्या विविध उपक्रमांचे प्रतिकृतीच्या माध्यमातून समाजापर्यंत संदेश पोहोचविण्याचा छंद जोपासला आहे. त्यांनी आतापर्यंत व्यसनमुक्ती, स्वच्छ भारत अभियान, जलयुक्त शिवार, पाणी वाचवा, बेटी बचाव आदी विषयांबाबतचे संदेश आपल्या प्रतिकृतीतून दिला आहे. राक्षस, कोंबडा, एलियन, जोकर, कार्टून, ॲनाकोंडा, गोरिला, किंग काॅंग, फेटेवाला पैलवान अशा विविध दहा ते वीस फुटांपर्यंतच्या प्रतिकृती तयार केल्या आहेत. या शिल्पकलेतून लोकांचे समाजप्रबोधन करण्याचा जंगम यांचा उपक्रम उल्लेखनीय आहे.
प्रतिक्रिया
शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या गळतीच्या दुरुस्तीचे काम देखील मी सेवाभावीवृत्तीने करतो. मूर्ती बनविणे, शिल्पकलेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्यातून मला समाधान लाभते.
-चंद्रकांत जंगम
फोटो (०२०५२०२१-कोल-कोरोना प्रतिबंध संदेश) : सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी यमाची रेड्यावर बसलेली दहा फूट उंचीची प्रतिकृती तयार करून कोरोना प्रतिबंधाचा संदेश दिला आहे.
===Photopath===
020521\02kol_10_02052021_5.jpg
===Caption===
फोटो (०२०५२०२१-कोल-कोरोना प्रतिबंध संदेश) : सांगरूळ (ता. करवीर) येथील चंद्रकांत जंगम यांनी यमाची रेड्यावर बसलेली दहा फूट उंचीची प्रतिकृती तयार करून कोरोना प्रतिबंधाचा संदेश दिला आहे.