राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

By admin | Published: June 18, 2017 01:22 AM2017-06-18T01:22:28+5:302017-06-18T01:22:28+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातील मुस्लीम समाजाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी येथील आगारात इप्तार पार्टी दिली.

Message given by national integration | राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

राष्ट्रीय एकात्मतेचा दिला संदेश

Next

 अहेरीच्या एसटी आगारातील इफ्तार पार्टीत सर्व कर्मचारी सहभागी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगारातील मुस्लीम समाजाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी येथील आगारात इप्तार पार्टी दिली. या इप्तार पार्टीत शहरातील सर्व समाजाचे बांधव उपस्थित होते. सदर इप्तार पार्टीतून राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्मसमभाव वृत्तीचा संदेश दिला.
यावेळी अहेरी आगाराचे व्यवस्थापक युवराज राठोड, बसस्थानक प्रमुख जितेंद्र राजवैद्य, एसटी कामगार संघटनेचे सचिव पठाण, इंटक संघटनेचे सचिव आसिफ कुरेशी, वरिष्ठ लिपीक चरण चहारे, रशीद मोहम्मद, सुरेश जोरगलवार, अनिस शेख, अफसर खान, सुलेमान शेख, अन्वर कुरेशी, अमजद शेख, रफीउद्दीन शेख, अस्लम शेख, एस. खान, मुनशाद कुरेशी, कंटीवार, रतने, सतीश कुमरे, अशरफ कुरेशी, किशोर गट्टुवार आदी उपस्थित होते. सध्या मुस्लीम धर्माचा पवित्र रमजान महिना सुरू आहे. यावेळी रोजा (उपवास) ठेवण्यात येतो. त्यामुळे सर्व उपवासधारकांसाठी इप्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित एसटी कर्मचाऱ्यांनी आपसात चर्चा केली आहे. प्रत्येकाने आपल्यामध्ये सर्वधर्म समभाव जोपासला पाहिजे, असे मनोगतातून अनेकांनी व्यक्त केले.

Web Title: Message given by national integration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.