‘एमएच-सीईटी’ आज

By admin | Published: May 5, 2016 12:33 AM2016-05-05T00:33:30+5:302016-05-05T00:50:06+5:30

प्रशासनाची तयारी पूर्ण : १४ हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

'MH-CET' today | ‘एमएच-सीईटी’ आज

‘एमएच-सीईटी’ आज

Next

कोल्हापूर : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी व औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी-२०१६) आज, गुरुवारी होणार आहे. राज्याच्या सामायिक परीक्षा विभागातर्फे परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी कोल्हापूर केंद्रावरून १४ हजार २७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे.
कोल्हापूर शहरातील ३४ उपकेंद्रांवर गुरुवारी सकाळी दहा ते दुपारी साडेचार यावेळेत ही परीक्षा होणार आहे. यातील भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पहिला पेपर सकाळी दहा ते साडेअकरा यावेळेत होईल. यानंतर दुपारी बारा ते दीड यावेळेत जीवशास्त्राचा आणि दुपारी तीन ते साडेचार यावेळेत गणित विषयाचा पेपर होणार आहे. यंदा पहिल्यांदाच आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांसाठी एकत्रितपणे सामायिक प्रवेश परीक्षा होत आहे. जिल्हा प्रशासनाने परीक्षेचे नियोजन केले आहे.

अवधूत पाटीलचा कोठडीत अभ्यास
कोल्हापूर : चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेला संशयित आरोपी अवधूत पाटील (वय १९, रा. देऊळवाडी, ता. भुदरगड) याची बुधवारी जामिनावर सुटका झाली. आज, गुरुवारी वैद्यकीय प्रवेशासाठी होणारी ‘सीईटी’ परीक्षा तो देणार आहे. त्यासाठी त्याने पोलिस ठाण्यातील कोठडीत बसून अभ्यास केला आहे.
चोरीच्या गुन्ह्याखाली लक्ष्मीपुरी पोलिसांनी अवधूत पाटीलला अटक केली होती. तो अभ्यासात हुशार असल्याने त्याचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतली. दरम्यान, राजारामपुरी पोलिस त्याला तपासासाठी फिरवत असताना तो जिन्यावरून तोल जाऊन पडून गंभीर जखमी झाला होता. सीपीआरमध्ये उपचार करून प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्याला बिंदू चौक येथील कारागृहात ठेवले. तेथून त्याला जामीन मिळाला. पोलिस कोठडीत असताना ‘सीईटी’ परीक्षा देण्यासाठी तो अभ्यास करीत होता. त्यासाठी पोलिसांनी त्याला पुस्तके पुरविली होती. आज, गुरुवारी होणारी ‘सीईटी’ परीक्षा तो देणार आहे. (प्रतिनिधी)

एक हजार अधिकारी, कर्मचारी
परीक्षेसाठी महसूल व अन्य विभागांतील सुमारे एक हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत असणार आहेत. त्यांना परीक्षा विषयक कामकाजाचे दोन टप्प्यांत प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशासनातर्फे बुधवारी दुपारनंतर परीक्षा केंद्रांवर बैठक क्रमांक टाकण्याचे काम सुरू होते.

Web Title: 'MH-CET' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.