‘म्हाडा’चे जास्तीत जास्त प्रकल्प कोल्हापूरात राबविणार

By admin | Published: April 17, 2017 07:17 PM2017-04-17T19:17:03+5:302017-04-17T19:17:03+5:30

समरजीतसिंह घाटगे : ‘लोकमत’ ला सदिच्छा भेट

Mhada's maximum projects will be executed in Kolhapur | ‘म्हाडा’चे जास्तीत जास्त प्रकल्प कोल्हापूरात राबविणार

‘म्हाडा’चे जास्तीत जास्त प्रकल्प कोल्हापूरात राबविणार

Next

आॅनलाईन लोकमत

कोल्हापूर, दि. १७ : ‘म्हाडा’ च्या वतीने केवळ एकच प्रकल्प कोल्हापूरात सुरू आहे. मात्र योग्य जागांचा शोध घेऊन गरजूंना हक्काचे घर देण्यासाठी अधिकाधिक गृह प्रकल्प कोल्हापूरात राबविणार असल्याची माहिती पुणे ‘म्हाडा’चे अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

‘म्हाडा’च्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रथमच घाटगे यांनी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. गेले तीन वर्षे ‘म्हाडा’चे अध्यक्ष पद रिक्त होते, त्यामुळे ‘म्हाडा’च्या जागा विभागात नेमक्या कोठे व कोणत्या अवस्थेत आहेत, याची माहिती घेण्यास सुरूवात केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांसमवेत बैठका सुरू असून त्यामाध्यमातून नेमकी परिस्थिती समोर येईल. सध्या म्हाळुंगे (पुणे) येथे २८०० फ्लॅटचा मोठा प्रकल्प सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे २०२२ पर्यंत सर्वांसाठी घरांचे स्वप्न आहे, हे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ‘म्हाडा’ही पुढे असेल.

‘म्हाडा’च्या माध्यमातून केवळ महापालिका व नगरपालिका क्षेत्रातच स्वस्त घरे उपलब्ध करून दिली जातात. पण आगामी काळात ग्रामीण भागातील जनतेसाठी घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे घाटगे यांनी सांगितले. अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या ही कामातील खरी अडचण असून बाहेरून काही कर्मचारी घेता येतील का? याची चाचपणीही सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विभागात काही नवीन प्रकल्प सुरू करण्याबरोबरच प्रलंबीत प्रश्नांचा पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन समरजीतसिंह घाटगे यांचे अभिनंदन केले. यावेळी उप-वृत्तसंपादक चंद्रकांत कित्तुरे, उपव्यवस्थापक (मनुष्यबळ) संतोष साखरे, जाहीरात व्यवस्थापक विवेक चौगुले, श्रीराम जोशी, वरिष्ठ बातमीदार भारत चव्हाण आदी उपस्थित होते.

दर्जेदार बांधकामास प्राधान्य!

‘म्हाडा’च्या बांधकामाविषयी काही तक्रारी आहेत, ही जरी वस्तूस्थिती असली तरी आगामी काळात त्या येणार नाहीत. बांधकामाच्या गुणवत्तेत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नसल्याचे घाटगे यांनी सांगितले.

‘म्हाडा’चे नूतन अध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांनी सोमवारी ‘लोकमत’ शहर कार्यालयास भेट दिली. यावेळी ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व संपादक वसंत भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी डावीकडून चंद्रकांत कित्तूरे, विवेक चौगुले, संतोष साखरे, श्रीराम जोशी, भारत चव्हाण उपस्थित होते.

Web Title: Mhada's maximum projects will be executed in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.