म्हासुर्ली, गवशी, कोनोली तर्फ असंडोलीत दुरंगी लढतीचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:19 AM2020-12-25T04:19:26+5:302020-12-25T04:19:26+5:30

गत निवडणुकीत येथे निवडणूक निकालानंतर स्थानिक आघाड्यांनी एकत्र येऊन राजेंद्र सावंत यांना सलग पाच वर्षे सरपंच पदाची संधी ...

Mhasurli, Gavashi, Konoli towards Asandoli | म्हासुर्ली, गवशी, कोनोली तर्फ असंडोलीत दुरंगी लढतीचे चित्र

म्हासुर्ली, गवशी, कोनोली तर्फ असंडोलीत दुरंगी लढतीचे चित्र

Next

गत निवडणुकीत येथे निवडणूक निकालानंतर स्थानिक आघाड्यांनी एकत्र येऊन राजेंद्र सावंत यांना सलग पाच वर्षे सरपंच पदाची संधी दिली होती. सुरुवातीस वरिष्ठ पातळीवरून नेतेमंडळींनी ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही प्रभागातील कार्यकर्त्यांना भेटून चाचपणी करण्यात आली. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी आपले प्रयत्न थांबविले. प्रभाग क्रमांक एक आणि चारमध्ये दुरंगी, तर प्रभाग क्रमांक दोन आणि तीनमध्ये तिरंगी लढत होण्याचे सध्याचे चित्र आहे. काही अपक्षही आपले नशीब अजमावण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या सर्वच ठिकाणी भावकी, जातीय समीकरणे यावर उमेदवारी निश्चित करण्यासाठी बैठकांना वेग आला आहे. मात्र अंतिम चित्र अर्ज माघारीनंतरच स्पष्ट होणार आहे. येथील निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्यासह धामणी खोऱ्याचे लक्ष लागून राहिले आहे

राधानगरी आणि गगनबावडा तालुक्याच्या हद्दीवरील गाव म्हणून ओळख असणाऱ्या कोनोली तर्फ असंडोली येथे तीन प्रभागअंतर्गत ९ जागांसाठी निवडणूक होत असून स्थानिक पातळीवरील आघाड्यांमध्येच लढती होत आहेत. प्रभाग क्रमांक एक आणि दोनमध्ये दुरंगी लढत, तर प्रभाग क्रमांक ३ मध्ये निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. येथेही संपूर्ण निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.

याच परिसरातील पन्हाळा आणि राधानगरी तालुक्याच्या हद्दीवरील गाव असणार्‍या गवशी येथे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असून येथील तीन प्रभागाअंतर्गत ७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. सुरुवातीस सत्ताधारी आघाडीने विरोघी आघाडीस तीन जागा देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र एका प्रभागातील खुल्या प्रवर्गातील जागेवरून चर्चा फिसकटल्याने येथे सर्वच प्रभागात सत्ताधारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस-शिवसेना अशी दुरंगी लढत होण्याचे सध्याचे चित्र आहे. म्हासुर्ली - प्रभाग ३, जागा ११ ,मतदान ३०७२

कोनोली तर्फ असंडोली - प्रभाग ३, जागा ९, मतदान ११८४ गवशी - प्रभाग ३, जागा ७, मतदान ८५१

Web Title: Mhasurli, Gavashi, Konoli towards Asandoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.