जिल्ह्यातील ‘एमआयडीसी’ रविवारपासून आठ दिवस बंद राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:25 AM2021-05-14T04:25:04+5:302021-05-14T04:25:04+5:30
सुमारे ८०० कोटींची उलाढाल ठप्प होणार शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतींमध्ये दरमहा ७० हजार टन कास्टिंग्जचे उत्पादन होते, ...
सुमारे ८०० कोटींची उलाढाल ठप्प होणार
शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल-हातकणंगले औद्योगिक वसाहतींमध्ये दरमहा ७० हजार टन कास्टिंग्जचे उत्पादन होते, तर सरासरी ६०० कोटींची उलाढाल होते. रविवारपासूनच्या आठ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये फौंड्री बंद राहिल्याने या क्षेत्रातील सुमारे २२५ कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याचे ‘आयआयएफ’चे अध्यक्ष सुमित चौगुले आणि ‘स्मॅॅक’चे अध्यक्ष अतुल पाटील यांनी सांगितले. फौंड्रीसह अन्य क्षेत्रांतील उद्योग, कारखाने बंद राहणार असल्याने सुमारे ८०० कोटींची उलाढाल ठप्प होणार असल्याचे ‘मॅॅक’चे अध्यक्ष गोरख माळी यांनी सांगितले.
चौकट
कामगारांची व्यवस्था करणारे कारखाने सुरू राहणार
अत्यावश्यक सेवेतील आणि उत्पादनांची निर्यात करणारे तसेच जे उद्योजक कामगारांच्या आठ दिवस राहण्याची व्यवस्था करतील, असे उद्योग, कारखाने या लॉकडाऊनमध्ये सुरू राहणार आहेत. त्याबाबत आमदार जाधव यांच्यासमवेतच्या बैठकीत चर्चा झाली असल्याचे ‘मॅॅक’चे अध्यक्ष गोरख माळी यांनी सांगितले.