एमआयडीसी देणार नाही

By Admin | Published: June 28, 2015 12:52 AM2015-06-28T00:52:21+5:302015-06-28T00:52:51+5:30

‘स्मॅक’मध्ये बैठक : मिणचेकर, महाडिकांची उद्योजकांना ग्वाही

MIDC will not give it | एमआयडीसी देणार नाही

एमआयडीसी देणार नाही

googlenewsNext

शिरोली : शहरातील मोजक्याच राजकीय लोकांना हद्दवाढ हवी आहे. शिरोली आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहती हद्दवाढीत कदापि जाऊ देणार नाही, असे आश्वासन आमदार डॉ. सुजित मिणचेकर व अमल महाडिक यांनी उद्योजकांना दिले. शनिवारी ‘स्मॅक’च्या सभागृहात ही बैठक झाली.
मिणचेकर म्हणाले, शहरातील लोकांनाही महापालिका सुविधा देण्यास सक्षम नाही हे लक्षात आले आहे. हद्दवाढीला माझा विरोध कायम राहणारच. माझ्या हातकणंगले मतदारसंघातील एकही गाव हद्दवाढीत जाऊ देणार नाही. हद्दवाढीविरोधात मी उद्योजकांच्या बरोबर आहे, असे मिणचेकर म्हणाले.
आमदार अमल महाडिक म्हणाले, महापालिकेने पहिल्यांदा शहराचा विकास करावा. शहर मॉडेल करावे, मग शेजारच्या गावांना हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा.
यावेळी स्मॅकचे अध्यक्ष सुरेंद्र जैन, उपाध्यक्ष राजू पाटील, सचिन पाटील, निरज झंवर, जयदीप चौगुले, एम. वाय. पाटील, जी. बी. दिघे, डी. एन. कामत, आदीं उद्योजक उपस्थित होते.

Web Title: MIDC will not give it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.