Kolhapur: काम देतो म्हणून सांगितले, शिरोलीत परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केले; संशयित आरोपी फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 01:24 PM2024-05-20T13:24:10+5:302024-05-20T13:24:28+5:30

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Migrant girl assaulted in Shiroli as job offer; Suspect absconding | Kolhapur: काम देतो म्हणून सांगितले, शिरोलीत परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केले; संशयित आरोपी फरार

Kolhapur: काम देतो म्हणून सांगितले, शिरोलीत परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केले; संशयित आरोपी फरार

शिरोली : मोलमजुरीचे काम देतो, असे सांगून परप्रांतीय तरुणीवर अत्याचार केला. या प्रकरणी माजीद खान आणि रुस्तुम खान (संपूर्ण नाव, पत्ता नाही) या दोघांच्या विरोधात संबंधित तरुणीने गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी माजीद खान फरार झाला आहे. शिरोली पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, पीडित तरुणी ही छत्तीसगढ येथील असून तुला काम देतो, असे फोनवरून सांगून माजीद खान याने शिरोलीत बोलावून घेतले. ११ मे रोजी शिरोली माळवाडी येथील सयाजी चव्हाण यांच्या भाड्याने घेतलेल्या खोलीत रात्री संबंधित तरुणीवर माजीद खान याने जबरदस्तीने अत्याचार केला, तसेच १२ मे रोजीसुद्धा अत्याचार केला.

संशयित आरोपी माजीद खान याने फिर्यादीस तू आरडाओरडा केला, कोणाला सांगितले तर तुला व तुझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिला खोलीमध्ये कोंडून ठेवल्याबाबत फिर्यादी यांनी १७ मे रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयातील महिला साहाय्य कक्ष येथे पोलिस उपनिरीक्षक आर.बी. पवार यांच्या समक्ष दिलेल्या तक्रारी जबाबावरून गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास पो.स.इ. घोगरे करीत आहेत.

दरम्यान, शिरोली गावातील खोली भाड्याने देताना मालकांनी संबंधितांकडून योग्य कागदपत्रे घ्यावीत, अशी मागणी शिरोली हिंदुत्ववादी संघटनेकडून करण्यात आली आहे. आरोपीस तत्काळ अटक करावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

Web Title: Migrant girl assaulted in Shiroli as job offer; Suspect absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.