शिरगावातील सहा कुटुंबातील ३४ जणांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:17 AM2021-07-24T04:17:05+5:302021-07-24T04:17:05+5:30
शिरगाव : शिरगाव ता.राधानगरी येथील शिवाजी बापू पाटील यांच्या बंगल्यावर पश्चिमेकडील उंच डोंगरावरील झाडांसह दरडीचा मोठा भाग कोसळून झालेल्या ...
शिरगाव : शिरगाव ता.राधानगरी येथील शिवाजी बापू पाटील यांच्या बंगल्यावर पश्चिमेकडील उंच डोंगरावरील झाडांसह दरडीचा मोठा भाग कोसळून झालेल्या नुकसानीचा आज पंचनामा करण्यात आला. यामध्ये पंधरा लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले असून गंभीर जखमींवर कोल्हापूरमध्ये उपचार सुरू आहेत. तर गावातील सहा कुटुंबातील ३४ जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे. शुक्रवारी दुपारी सर्कल अधिकारी शिवाजीराव भोसले, तलाठी सरदार चौगले, पोलीस पाटील संजय कांबळे, सरपंच रूपाली राजेंद्र व्हरकट, उपसरपंच शरद कांबळे व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.
याचा तातडीने अहवाल प्रांताधिकारी व तहसीलदार यांना पाठवून देऊन नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
गावातील सहा कुटुंबातील ३४ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.