कोल्हापूर जिल्ह्यातील 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 07:18 PM2019-08-05T19:18:46+5:302019-08-05T19:21:08+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश आहे.
कोल्हापूर: जिल्ह्यात झालेल्या अतीवृष्टीमुळे 1353 कुटुंबातील 5851 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. यात सर्वाधिक हातकणंगले तालुक्यातील 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश आहे.
स्थलांतरीत कुटुंबांची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे करवीर- सुतारमळा, जामदार क्लब, शुक्रवार पेठ, डॉ. प्रभु विन्स हॉस्पिटल, बापट कँप, हळदी, आंबेवाडी, चिखली, गाडीगोंडवाडी, साबळेवाडी आणि शिंदेवाडी येथील 313 कुटुंबातील1189 व्यक्तींचा समावेश आहे. हातकणंगले तालुक्यातील इंगळी, इचलकरंजी व शेळके मळा, रुई, शिरोली पु, निलेवाडी, चंदूर, भेंडवडे, घुणकी, हालोंडी, खोची आणि भादुले या गावांमधून 518 कुटुंबातील 2282 व्यक्तींचा समावेश आहे.
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी, कुरुंदवाड, कवठेसार, जुने दानवाड, शिरढोण, हेरवाड, अर्जुनवाड, दानोळी, टाकवडे आणि धरणगुत्ती या गावांमधील 365 कुटुंबातील 1613 व्यक्ती, पन्हाळा तालुक्यातील बा. भोगाव, बादेवाडी, आपटी, काखे, देसाईवाडी, पाटपन्हाळा, देवठाणे, पोर्ले तर्फ बोरगांव, कसबा ठाणे, पुशिरे-बोरगांव आणि कोडोली येथील 140 कुटुंबातील 683 व्यक्ती, चंदगड- कडलगे बु., तांबुळवाडी आणि मौजे होसूर गावातील 3 कुटुंबातील24 व्यक्ती, कागल तालुक्यातील चिखली 5 कुटुंबातील 26 व्यक्ती, शाहुवाडी तालुक्यातील थेरगावमधील एका कुटुंबातील 2 व्यक्ती, भुदरगड तालुक्यातील शेणगांव, गारगोटी, फणसवाडी येथील 3 कुटुंबातील 9 व्यक्ती तर राधानगरी तालुक्यातील फेजीवडे, लोंडेवाडी आणि आवळी येथील 5 कुटुंबातील 23 व्यक्तींचा स्थलांतरात समावेश आहे.