सावर्डे, काखे व कोडोलीतील ३०० हून अधिक कुटुंबांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:15 AM2021-07-24T04:15:55+5:302021-07-24T04:15:55+5:30
: वारणा नदीस आलेल्या पुराचे पाणी सावर्डे, काखे व ...
: वारणा नदीस आलेल्या पुराचे पाणी सावर्डे, काखे व कोडोली येथील नागरी वस्तीत पाणी आल्याने सुमारे ३०० हून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे. तर कोडोली येथील सर्वोदय विकास सेवा सोसायटीचे धान्य दुकान नं ३ च्या इमारतीत गुरुवारी रात्री अचानक पुराचे पाणी गेल्याने रेशन वाटपासाठी आलेला गहू व तादळाची पोती पाण्यात बुडाली. यामुळे बाजाराप्रमाणे सुमारे ७०ते ८० हजारांचे नुकसान झाले. स्थलांतरित कुटुंबांना सरकारी शाळा व अन्य सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले असल्याचे कोडोली विभागाचे मंडल अधिकारी अभिजीत पवार यांनी सांगितले. शुक्रवारीही संततधार पाऊस कोसळत असल्याने स्थलांतरित करावी लागणाऱ्या कुटुंबांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. कोडोली बोरपाडळे मार्गावर नरसोबा ओढ्यावर असलेला पुलावर पहिल्यांदाच पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद करण्याता आला होता.
फोटो : कोडोली येथे ८१ वर्ष वयाच्या वृध्द महिलेस पाण्यातून बाहेर काढण्यात आला.