आरे येथील ग्रामस्थांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:16 AM2021-07-23T04:16:50+5:302021-07-23T04:16:50+5:30
सडोली (खालसा) - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तुळशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने आरेे (ता. ...
सडोली (खालसा) - गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने तुळशी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने आरेे (ता. करवीर) येथे संभाव्य महापुराचा धोका टाळण्यासाठी ग्रामस्थांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.
२०१९ मध्ये आलेल्या महापुराने आरे (ता. करवीर) येथील अनेकांची घरे पडल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते. पावसाची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांनी गावातील ग्रामस्थांनी तात्काळ सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असा आदेश दिला. पावसाचा जोर असाच राहिल्यास गावाचा संपर्क तुटण्याची शक्यता असून, प्रशासन लक्ष्य ठेवून असल्याचे तलाठी नरेंद्र झुंबड यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ग्रामस्थांना एकत्र ठेवता येत नसल्याने ग्रामस्थांनी शासनाच्या मदतीची वाट न पाहता आपली व्यवस्था आपणच केली पाहिजे.
दरम्यान, महापुराचा धोका ओळखून ग्रामसेवक दीपा यादव, आरोग्य सेवक कुमठेकर, तलाठी नरेंद्र झुंबड, गजानन मळीक यांनी गरोदर महिला, वयस्कर ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.