कोल्हापूरजवळ भूकंपाचा सौम्य धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:29 AM2021-09-06T04:29:21+5:302021-09-06T04:29:21+5:30
कोल्हापूर : येथून पश्चिमेस सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कळे आणि पुनाळ येथील शेतात शनिवारी रात्री ११ वाजून ४८ ...
कोल्हापूर : येथून पश्चिमेस सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कळे आणि पुनाळ येथील शेतात शनिवारी रात्री ११ वाजून ४८ मिनिटे ४८ सेकंदावेळी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. सांगली जिल्ह्यातील चांदोली परिसरातील वारणावतीपासून २०० मीटरवर भूकंपाचा केंद्र राहिले. भूकंपाची तीव्रता सौम्य असल्याने कोणतीही हानी झाली नसल्याचे जिल्हा प्रशासनाने रविवारी सांगितले.
वारणा पाटबंधारे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल इतकी होती. खोली जास्त असल्याने हादरे कमी जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू वारणावती राहिला तरी पुनाळ येथील शेतातही तो जाणवला. या भूकंपाची नोेंद राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्र आणि वारणा येथील भूकंप मापन केंद्रात झाली आहे. वारणा येथील केंद्रात २.८, तर राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रात ३.९ रिश्टर स्केल आणि ३८ किलोमीटर खोली भूकंपाची नोंद झाली आहे. कोल्हापूरपासून काही अंतरावरच भूकंपाचे धक्क जाणवल्याने याची रविवारी दिवसभर चर्चा राहिली.
कोट
कोल्हापूर पासून सुमारे १८ किलोमीटरवर असणाऱ्या कळे ते पुनाळ दरम्यानच्या शेतात शनिवारी रात्री अकराच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. मात्र त्याची तीव्रता कमी असल्याने काही हानी झालेली नाही.
प्रसाद संकपाळ,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कोल्हापूर.