दूध उत्पादकच आपले दैवत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:23 AM2021-05-08T04:23:44+5:302021-05-08T04:23:44+5:30
साके : दूध संस्थेचा कारभार चांगला करा, दूध उत्पादक आपले दैवत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान राखा, त्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये ...
साके :
दूध संस्थेचा कारभार चांगला करा, दूध उत्पादक आपले दैवत आहेत, त्यामुळे त्यांचा सन्मान राखा, त्यांची कोणत्याही परिस्थितीमध्ये हेळसांड होणार नाही, याची काळजी घ्या. चांगल्या कामासाठी मी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे, असे भावनिक उद्गार ‘गोकुळ’चे नूतन संचालक अंबरीश सिंह घाटगे यांनी काढले. व्हनाळी येथे रणदिवेवाडी येथील नवीन स्थापन केलेल्या महालक्ष्मी महिला दूध संस्थेचे संस्था नोंदणी प्रमाणपत्र देताना ते बोलत होते.
घाटगे म्हणाले, संस्था स्थापन करणे सोपे आहे, परंतु चालवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दूध उत्पादक शेतकरी डोळ्यांसमोर ठेवून संस्थेचा कारभार करा, आपण काय दूध संस्थेचा मालक नसतो. परंतु संस्थेचा विश्वस्त म्हणून काम करणे गरजेचे आहे. यावेळी अध्यक्ष अनिता महेंद्र संकपाळ, महेंद्र संकपाळ, उपाध्यक्ष सुषमा भोरे, अर्चना खाडे, प्रियांका केंगार, आप्पासोा खोत, शिवाजी खोत उपस्थित होते.
फोटो ओळी : रणदिवेवाडी (ता. कागल) येथील नूतन महालक्ष्मी महिला दूध संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र देताना माजी आमदार संजय घाटगे, नूतन संचालक अंबरीश सिंह घाटगे, महेंद्र संकपाळ, धनाजी मगदूम व इतर मान्यवर आदी.
कृपया जाहिरात पार्टी प्राधान्याने बातमी घ्यावी ही विनंती