‘गोकुळ’च्या योजनेचा दूध उत्पादकांनी फायदा घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:17 AM2021-07-15T04:17:25+5:302021-07-15T04:17:25+5:30

पेरणोली : ‘गोकुळ’ दूध संघाकडून दूध उत्पादकांसाठी म्हैस खरेदीसाठी बिनव्याजी पैसे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा ...

Milk producers should take advantage of Gokul's scheme | ‘गोकुळ’च्या योजनेचा दूध उत्पादकांनी फायदा घ्यावा

‘गोकुळ’च्या योजनेचा दूध उत्पादकांनी फायदा घ्यावा

Next

पेरणोली : ‘गोकुळ’ दूध संघाकडून दूध उत्पादकांसाठी म्हैस खरेदीसाठी बिनव्याजी पैसे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेचा फायदा उत्पादकांनी घ्यावा, असे आवाहन ‘गोकुळ’च्या संचालिका अंजना रेडेकर यांनी केले.

पेरणोली, हरपवडे, कोरीवडे आदी गावांतील दूध संस्थांना रेडेकर यांनी भेट दिली. या वेळी पेरणोली येथील भेटीदरम्यान त्या बोलत होत्या.

रेडेकर म्हणाल्या, उत्पादकांचे हित हेच ‘गोकुळ’चे मुख्य ध्येय आहे. ग्रामीण भागात रोजगार वाढविण्यासाठी आण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून उत्पादकांना म्हैस खरेदीसाठी बिनव्याजी पैसे उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

या वेळी केदारलिंग, भावेश्वरी, संत तुकाराम दूध संस्थेला भेट दिली. या वेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

संत तुकाराम संस्थेत ज्ञानदेव सासूलकर, धनाजी सुतार, छाया गुरव, संजय दळवी, सदाशिव कांबळे, किरण पाटील, दशरथ होलम, महेश कोल्हे, बाबू कांबळे आदी उपस्थित होते. कृष्णा सावंत यांनी स्वागत केले. सचिव तानाजी कालेकर यांनी आभार मानले.

फोटो ओळी : पेरणोली (ता. आजरा) येथील संत तुकाराम दूध संस्थेत अंजना रेडेकर यांचा सत्कार करताना धनाजी सुतार. या वेळी कृष्णा सावंत, ज्ञानदेव सासूलकर, संजय दळवी, सदाशिव कांबळे, छाया गुरव आदी.

क्रमांक : १४०७२०२१-गड-०१

Web Title: Milk producers should take advantage of Gokul's scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.