दूध अनुदानप्रश्नी ‘स्वाभिमानी’ रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 12:24 AM2018-07-16T00:24:21+5:302018-07-16T00:24:32+5:30
कोल्हापूर : रविवारी रात्री बारा वाजता ग्रामदैवतांना अभिषेक घालून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते दूध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले. त्यांनी मुंबई-पुण्याकडे जाणारी दूध वाहतूक रोखण्याची जय्यत तयारी केली आहे. आंदोलनाआधीच पोलिसांनी रविवारी दुपारी कार्यकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली असून, त्यांच्याकडून शपथपत्रे लिहून घेतल्याने
कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.
गाईच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज, सोमवारपासून दूध संकलन व वाहतूक बंद आंदोलन पुकारले आहे. पुणे जिल्'ातील काही खासगी दूध संघांनी शनिवारी प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ करून आंदोलनाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला खासदार राजू शेट्टी यांनी विरोध केला असून, अगोदरच १७ रुपयांनी दूध खरेदी करणाऱ्या संघांनी तीन रुपये वाढवून उत्पादकांना काय दिलासा दिला? असा सवाल करीत आंदोलन होणारच असे ठणकावून सांगितले आहे. त्यानुसार ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी तयारी केली आहे. सरकारकडूनही आंदोलनाबाबत पोलिसांना सूचना दिल्या असून, रविवारी दिवसभर ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांच्यावर कलम १०७ नुसार प्रतिबंधात्मक कारवाई केली. आंदोलनात कायदा-सुव्यवस्था बिघडली जाणार नाही, याबाबतची शपथपत्रे लिहून घेतली आहेत. त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून, सरकार चर्चेपेक्षा आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करीत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
रविवारी रात्री प्रत्येक गावातील कार्यकर्ते ग्रामदैवतांना दुधाचा अभिषेक घालून आंदोलनात उतरणार आहेत. पश्चिम महाराष्टÑातील सर्वच संघांनी आज, सोमवारी दूध संकलन बंदचा निर्णय घेतल्याने प्राथमिक दूध संस्थांमध्ये दूध संकलन होणार नाही; पण कार्यकर्त्यांनी मुंबई, पुण्याकडे जाणारी दूध वाहतूक रोखण्याची व्यूहरचना आखली आहे. रात्रीपासूनच दुधाची वाहतूक रोखण्यास सुरुवात झाली आहे.
संस्था कर्मचाºयांची ‘पंढरी’ची वारी
‘गोकुळ’सह इतर दूध संघांनी आज, सोमवारी दूध संकलन बंद करण्याचा निर्णय घेतल्याने प्राथमिक दूध संस्थांतील कर्मचाºयांना हक्काची सुटी मिळाली. सुट्टी सदुपयोगी लावण्यासाठी बहुतांशी कर्मचाºयांनी पंढरपूर वारीला भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत.