गडहिंग्लजमध्ये गिरणी कामगारांचा मोर्चा - मुंबईतील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांसह विविध मागण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 11:41 PM2017-12-18T23:41:53+5:302017-12-18T23:44:51+5:30
गडहिंग्लज : मुंबई येथील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांच्या मागणीसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील गिरणी कामगारांनी
गडहिंग्लज : मुंबई येथील गिरण्यांच्या जागेतील मोफत घरांच्या मागणीसह प्रलंबित विविध मागण्यांसाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगडसह सीमाभागातील गिरणी कामगारांनी येथील प्रांतकचेरीवर धडक मारली.
दुपारी येथील श्री महालक्ष्मी मंदिरापासून मोर्चाला सरुवात झाली. बाजारपेठ, बसवेश्वर चौक, मेन रोड, अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे मोर्चा प्रांतकचेरीवर आला. याठिकाणी
कॉ. दत्तात्रय अत्याळकर, कॉ. अमृत कोकितकर, कॉ. रामजी देसाई, कॉ. शांताराम पाटील, कॉ. गोपाळ गावडे यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर प्रांताधिकाºयांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, गिरण्यांच्या जागेत प्राधान्याने मोफत घरे द्या, सर्व गिरणी कामगारांना घर पात्रतेचा दाखला द्या, याद्यांची छाननी करून बोगस नावे ताबडतोब रद्द करा, गिरणी कामगारांच्या घर बांधणीचा पूर्ण आराखडा जाहीर करा, गिरणी कामगारांच्या मुलांना नोकºया द्या, गिरणी कामगारांना रेशन व ‘ईएसआय’चा लाभ द्या, आदी मागण्यांचा समावेश आहे.