मंडलिक कारखान्यात मिलरोलर पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:18 AM2021-06-06T04:18:02+5:302021-06-06T04:18:02+5:30
म्हाकवे : केवळ साखरनिर्मिती करून कारखानदारी टिकणार नाही. त्यासाठी उपपदार्थनिर्मिती प्रकल्पाची गरज आहे. त्यामुळे ...
म्हाकवे : केवळ साखरनिर्मिती करून कारखानदारी टिकणार नाही. त्यासाठी उपपदार्थनिर्मिती प्रकल्पाची गरज आहे. त्यामुळे आपण ४५ केएलपीडी क्षमतेच्या डिस्टलरी प्रकल्पाची उभारणी करत आहोत. हे काम युद्धपातळीवर सुरू असून, आगामी गळीत हंगामाबरोबरच हा प्रकल्पही कार्यान्वित करण्याचा निर्धार कारखान्याचे अध्यक्ष खासदार संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याच्या आगामी गळीत हंगामासाठी मिलरोलरचे पूजन करण्यात आले. खासदार संजय मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली व नूतन उपाध्यक्ष बापूसो भोसले-पाटील यांचे हस्ते संपन्न झाला. या वेळी सत्यनारायण पूजा तज्ज्ञ संचालक प्रदीप चव्हाण व त्यांच्या पत्नी प्रणाली चव्हाण यांच्या हस्ते बांधण्यात आली.
स्वागत चिफ इंजिनिअर सर्जेराव पाटील यांनी केले. माजी उपाध्यक्ष बंडोपंत चौगुले, संचालक दिनकर पाटील, शंकर व्यंकू पाटील, आप्पासाहेब तांबेकर, शहाजी यादव, दत्तात्रय सोनाळकर, शहाजी पाटील, मारुती काळुगडे, विरेंद्र मंडलिक, ईगल प्रभावळकर, दत्तात्रय चौगले, मसू पाटील, जयसिंग गिरीबुवा, तज्ज्ञ संचालक प्रदीप चव्हाण, संचालिका नंदिनीदेवी नंदकुमार घोरपडे, राजश्री बाळासो चौगुले, कार्यकारी संचालक एन. वाय. पाटील, कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव पाटील, अधिकारी, कामगार उपस्थित होते. चिफ केमिस्ट विक्रम पाटील यांनी आभार मानले.
फोटो : ०५ मंडलिक शूगर
सदाशिवराव मंडलिक कारखान्याचे मिलरोलर पूजन करताना खासदार संजय मंडलिक. या वेळी नूतन उपाध्यक्ष बापूसाहेब भोसले, बंडोपंत चौगुले आदी.
छाया-जे के फोटो, सुरुपली