रेल्वेत नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

By Admin | Published: May 5, 2016 12:16 AM2016-05-05T00:16:54+5:302016-05-05T00:22:32+5:30

पोलिसांत गुन्हा : पैसे मागितल्यावर महिलेवर खुनी हल्ला

Millions of millions of jobs in railway jobs | रेल्वेत नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

रेल्वेत नोकरीच्या आमिषाने लाखोंचा गंडा

googlenewsNext

इन्फो
दर गुरुवारी महिलांची गर्दी
१९७१ पासून आमच्या आजोबांनी वाड्यातील विहीर पुनर्जीवित केलेली आहे. तीन वर्षांपूर्वी आम्ही स्वत: कोणाचीही मदत न घेता विहिरीतील गाळ काढून स्वच्छ करून ती वापरायोग्य केली. ढापे टाकून ती बंदिस्त केली. याशिवाय जलचाचणीही करून घेतल्याने पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्रमाणपत्र मिळालेले आहे. आता पाणीटंचाईच्या काळात या विहिरीचा वापर परिसरातील नागरिकांना होतो आहे. दर गुरुवारी पाणीकपातीच्या दिवशी तर ठिकठिकाणाहून महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर येतात. याशिवाय म. गांधी मार्गावरील पाणपोईलाही याच विहिरीतून पुरवठा केला जात आहे. पाण्याचा धर्म होतो आहे, हेच मोठे समाधान आहे.
- महेश मिरजकर, बुधवार पेठ, जुने नाशिक
इन्फो
गाळ काढण्यासाठी सहाय्य हवे
सोमवार पेठेतील गुलालवाडीसमोर असलेल्या आमच्या वाड्यात दोन विहिरी आहेत. त्यातील एका विहिरीचा वापर सुरू आहे. दुसर्‍या विहिरीलाही पाणी आहे; परंतु तिची साफसफाई करावी लागणार आहे. कार्यरत असलेल्या विहिरीतील पाण्याचा उपभोग आसपासचे नागरिक घेत आहेत. महापालिकेने दुसर्‍या बंद असलेल्या विहिरीचा गाळ काढून देण्यास मदत केली तर आणखी जादा पाणी उपलब्ध होऊ शकेल.
- नंदू गर्गे, सोमवार पेठ
इन्फो
स्वयंसेवी संस्थांची बनवेगिरी
जुन्या वाड्यांमधील विहिरी पुनर्जीवित करून नैसर्गिक जलस्त्रोतांचे संवर्धन करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनी काही वर्षांपूर्वी पुढाकार घेतला होता. काही संस्थांनी त्यात थोडेफार काम केलेही; परंतु संस्थांकडून केवळ काम केल्याचा देखावा केला जाऊन प्रसिद्धी मिळविली जात असल्याचा आरोप एका वाड्याच्या मालकाने केला. एका संस्थेने तर काम तुम्ही करा फक्त आमचे बॅनर वापरू द्या, असा आग्रह धरल्याचा कटू अनुभवही या वाडामालकाने विशद केला. महापालिकेने जुन्या वाड्यांमध्ये असलेल्या विहिरींची स्वच्छता मोहीम हाती घेतली तरी पाणीप्रश्नी काही अंशी दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.

फोटो - ०३ पीएचएमए ६५ ते ६९
सर्व फोटो वापरावेत.

Web Title: Millions of millions of jobs in railway jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.