अखिलेश करोशी याच्या शिक्षणाला लाखमोलाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:24 AM2021-04-09T04:24:06+5:302021-04-09T04:24:06+5:30
अखिलेश याचे पालकत्व महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक सुनील आणि चारूलता पाटील यांनी स्वीकारले आहे. या ...
अखिलेश याचे पालकत्व महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेतील सहायक शिक्षक सुनील आणि चारूलता पाटील यांनी स्वीकारले आहे. या विद्यार्थ्याला पुण्यातील सीओईपी इंजिनिअरिंग कॉलेजला कॉम्प्युटर सायन्सला प्रथम वर्षाला प्रवेश मिळाला आहे. या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज होती. त्याची माहिती मिळताच खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, सुधाकर सावंत आणि इतर संघटना प्रमुखांच्या वतीने मदतीचे आवाहन करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत शिक्षकांनी एक लाख रुपयांचा निधी जमा झाला. हा निधी या विद्यार्थ्याला भरत रसाळे, सुधाकर सावंत यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आला. यावेळी उजळाईवाडी येथील रविराई ट्रस्टचे विश्वस्त महेश धर्माधिकारी, सावली केअर सेंटरचे डॉ. किशोर देशपांडे, रविराईचे विश्वस्त चंद्रशेखर पाटील, समितीचे शहराध्यक्ष संजय पाटील, संजय कडगांवे, उमेश देसाई,
शिक्षक शिक्षकेतर महासंघाचे संतोष आयरे, प्राथमिक शिक्षक संघाचे सुनील गणबावले, पुरोगामी शिक्षक समितीचे विलास पिंगळे, उत्तम कुंभार, जोतीबा जाधव, सुनील पाटील, चारुलता पाटील, कुमार पाटील, राम भोळे, युवराज सरनाईक, डॉ. सविता देसाई, सचिन यादव उपस्थित होते.
फोटो (०८०४२०२१-कोल-शिक्षक मदत) : कोल्हापुरातील प्राथमिक शिक्षकांच्या वतीने भरत रसाळे, सुधाकर सावंत यांनी अखिलेश करोशी या विद्यार्थ्याला शिक्षणासाठी एक लाख रुपयांचा निधी सुपुर्द केला. यावेळी शेजारी महेश धर्माधिकारी, किशोर देशपांडे आदी उपस्थित होते.