कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक : ठाकरे यांचे दोन शब्दांचे ‘उत्तर’; क्षीरसागर यांचा लढण्यासाठी आग्रह

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:43 PM2022-02-22T12:43:30+5:302022-02-22T12:44:22+5:30

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त

Minister Aditya Thackeray gave a two word answer on Kolhapur North Assembly by election | कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक : ठाकरे यांचे दोन शब्दांचे ‘उत्तर’; क्षीरसागर यांचा लढण्यासाठी आग्रह

कोल्हापूर उत्तरची पोटनिवडणूक : ठाकरे यांचे दोन शब्दांचे ‘उत्तर’; क्षीरसागर यांचा लढण्यासाठी आग्रह

Next

कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहर शिवसेनेचा गड आहे. दोन अपवाद वगळता गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेला लोकांनी मतदान केले आहे. म्हणूनच आपल्यासाठी कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ अतिशय महत्त्वाचा आहे. आगामी पोटनिवडणूक शिवसेनेने लढवावी, असा आमचा आग्रह आहे.

पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत आमच्या भावना पोहोचवा,’ अशी आळवणी शिवसेनेच्या माजी आमदारांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समोर केली. मंत्री ठाकरे यांनी सर्वांचा आग्रह तसेच भावना जाणून घेतल्या खऱ्या; पण कोणतेही ठोस आश्वासन दिले नाही. “साहेबांशी मी बोलतो,” एवढेच दोन शब्दांचे उत्तर त्यांनी दिले.

पर्यटनमंत्री ठाकरे यांनी सोमवारी शिवसेनेच्या शहर कार्यालयास भेट देऊन तेथे पदाधिकारी, माजी आमदार यांच्याशी संवाद साधला. त्यांच्याशी गप्पा मारताना माजी आमदार व पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर उत्तरमध्ये होऊ घातलेल्या पाेटनिवडणुकीचा विषय उपस्थित केला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या निवासस्थानी झालेल्या चर्चेत पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर शहर शिवसेनेचा गड असल्याचे तसेच तो आपल्याकडेच पाहिजे, असे सांगितले.

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबरमध्ये निधन झाल्याने कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली आहे. तिथे महाविकास आघाडी म्हणून तिन्ही पक्ष एकत्रित लढणार का? याबद्दल उत्सुकता आहे. शिवसेनेला विशेषत: क्षीरसागर यांना या मतदारसंघात मैत्रीपूूर्ण लढत व्हावी, असे वाटते. त्यांनी त्यासाठी जोरदार तयारीही केली आहे. पक्षनेतृत्वाकडून परवानगी मिळण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंत्री ठाकरे यांच्या या दौऱ्यालाही महत्त्व होते. परंतु त्यांनी उमेदवारीबाबत फारसे ठोस असे आश्वासन दिले नाही.

आमच्या भावना पोहोचवा

  • दोन निवडणुकींत झालेला पराभव वगळता १९९० पासून शिवसेनेचे आमदार विजयी होत आहेत. त्यामुळे आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांना कोल्हापूर उत्तरमधून शिवसेनेचे आमदार पाहिजे आहेत.
  • आम्ही सर्व जण एकदिलाने येणारी निवडणूक लढण्यासाठी आग्रही आहोत. त्यामुळे आमच्या भावना उद्धव साहेबांपर्यंत पोहोचवा. त्यांना आमचा आग्रह असल्याचे सांगा, असे आवाहन यावेळी पदाधिकाऱ्यांनी केले.
  • माजी आमदार चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील यांनी आपली भूमिका यावेळी स्पष्ट केली.

Web Title: Minister Aditya Thackeray gave a two word answer on Kolhapur North Assembly by election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.