राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

By समीर देशपांडे | Published: November 24, 2022 02:13 PM2022-11-24T14:13:07+5:302022-11-24T18:56:26+5:30

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांच्या भेटीवरुन केसरकरांनी साधला निशाणा

Minister Deepak Kesarkar criticized Aditya Thackeray on the visit of Deputy Chief Minister of Bihar Tejashwi Yadav | राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

राममंदिराची रथयात्री अडवणाऱ्यांसमोर लोटांगण, दीपक केसरकरांची आदित्य ठाकरेंवर टीका

Next

कोल्हापूर : ज्यांनी हिंदूंची राममंदिर रथयात्रा अडवली त्यांच्याच मुलासमोर लोटांगण घालणारे जनतेसमोर उघडे पडले आहेत. सत्तेसाठी कोणापुढेही ते लोटांगण घालतात हे पुन्हा दिसून आल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता केली. शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजदचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतल्यावरुन केसरकरांनी आदित्य यांच्यावर निशाणा साधला. कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते.

मंत्री केसरकर म्हणाले, पंचवीस वर्षे सत्ता असलेल्यांना मुंबईमध्ये सुविधा देता आल्या नाहीत. आम्ही आता सिध्दिविनायक आणि मुंब्रा देवीच्या ठिकाणी पार्किंगची सुविधाउपलब्ध करून देत आहोत. ज्यांनी गोवर लस घेतली नाही अशा मुलांचे अधिक संख्येने मृत्यू झाले आहेत. त्यामुळे लसीकरणावर भर दिला जात आहे असेही त्यांनी सांगितले.

सीमाप्रश्नी सामंजस्याने मार्ग काढू

सीमाप्रश्नाबाबत आम्ही सामंजस्याने मार्ग काढू, कर्नाटकची भाषा चुकीची आहे. त्यांनी आधी सीमाभागामध्येदोन कन्नडबरोबरच मराठी पाट्या लावायला परवानागी द्यावी.

राजू शेट्टींनी तडजोड करावी

ऊस दरप्रश्नी स्वाभिमानीच्या उद्याच्या चक्का जाम आंदोलनाबाबत केसरकर म्हणाले, कोल्हापूरमधील अनेक कारखान्यांनी चांगले दर जाहीर केले आहेत. आंदोलन शेतकरी आणि कारखानदार दोघांच्याही हिताचे नसल्याने राजू शेट्टी यांनी तडजोड करावी. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी त्यांची भेट घडवून देण्यास मी तयार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जगभरातील मराठी माणसांचा मुंबईत मेळावा घेण्याचे नियोजन

जगभरातील मराठी माणसांचा मोठा मेळावा मुंबईत घेण्याचे नियोजन असून यामध्ये तंजावरचे भोसले, होळकर, गायकवाड, सिंदिया यांचाही समावेश असेल. याबाबत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. 

'त्याचे' उदाहरण म्हणजे संजय राऊत

संजय राऊत हे आदरणीय संपादक आहेत. परंतू मराठी भाषा किती वाईट पध्दतीने वापरली जाते याचे ते उदाहरण असल्याची टीकाही केसरकर यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

Web Title: Minister Deepak Kesarkar criticized Aditya Thackeray on the visit of Deputy Chief Minister of Bihar Tejashwi Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.