Rajendra Patil-Yadravkar : जिल्हा बँकेवर मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकरांचा पुन्हा झेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2022 10:39 AM2022-01-07T10:39:40+5:302022-01-07T10:41:04+5:30
जयसिंगपूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळ तालुका विकास संस्था गटातून विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेवर ...
जयसिंगपूर : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर शिरोळ तालुका विकास संस्था गटातून विजयी झाले आहेत. जिल्हा बँकेवर त्यांनी आपले पुन्हा एकदा वर्चस्व सिध्द केले आहे. यड्रावकर यांना ९८ मते मिळाली. तर या गटातून त्यांच्या विरोधात असलेले दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांना अवघी ५१ मते मिळाली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी गणपतराव पाटील यांच्यासाठी सर्वपक्षीय गट-तट अशी मोट बांधली होती. राजकीय विरोध होणार, हे गृहित धरुन यड्रावकर यांनी एकला चलो रे अशी भूमिका घेत आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. निवडणूक निकालानंतर यड्रावकर यांनी दणदणीत विजय संपादन केला.
दत्तचे कारखान्याचे अध्यक्ष पाटील यांच्यावर ४७ मतांनी मात करुन यड्रावकर यांनी विजय प्राप्त केला. निकालानंतर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करुन गुलालाची उधळण करीत जल्लोष केला. यड्रावकर यांच्या विजयात त्यांचे बंधू संजय पाटील-यड्रावकरच किंगमेकर ठरले.