गृहराज्यमंत्री देसाई बंदोबस्ताची पाहणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:22 AM2021-04-17T04:22:25+5:302021-04-17T04:22:25+5:30
कोल्हापूर : गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई हे रविवारी (दि. १६) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंत्री देसाई ...
कोल्हापूर : गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई हे रविवारी (दि. १६) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मंत्री देसाई हे रविवारी दुपारी सव्वातीन वाजता जयसिंगपूर येथे पोलीस बंदोबस्ताची पाहणी करुन हातकणंगलेला जातील. तेथील पोलीस बंदोबस्ताची पाहणी केल्यानंतर कोल्हापूर शहरातील परिस्थिती पाहतील. सायंकाळी पाच वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर साताऱ्याला जातील.
---
पोस्ट पेमेंट बँक खाते उघडण्यासाठी सुविधा
कोल्हापूर : जिल्ह्यातील सर्व डाक कार्यालयांतून इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचे खाते उघडण्यासाठी व एईपीएस ही विशेष सेवा देण्यात येणार असल्याची माहिती प्रवर अधीक्षक रुपेश सोनावले यांनी दिली. संचारबंदी काळात लोकांच्या फिरण्यावर निर्बंध आल्याने बँकेचे ग्राहक जवळच्याच टपाल कार्यालयात किंवा पोस्टमन आणि ग्रामीण डाकसेवक यांच्यामार्फत स्वत:च्या घरीच बँकिंग सेवा मिळवू शकतात. रोख पैसे काढणे, पैसे हस्तांतरण, बिल भरणा, थेट लाभ हस्तांतरण, लाभार्थ्यांना पैसे देणे, आधार आधारित पेमेंट सेवा, ई-मेलद्वारे खाते स्टेटमेंट, पैसे पाठविण्यासाठी सुविधा मिळणार असून, नागरिकांनी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये अथवा पोस्टमनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
--